सप्टेंबरपासून अनेक नियमांमध्ये बदल; सर्वसामान्यांच्या आयुष्यावर होणार परिणाम

178

सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दिवसापासून आपल्या आयुष्यावर परिणाम करणाऱ्या अनेक नियमांमध्ये बदल होणार आहे. बॅंकिंग नियम, एलपीजीच्या किंमतीमध्ये सप्टेंबरपासून बदल होणार आहे.

( हेही वाचा : PF ची माहिती आता DigiLocker वरही उपलब्ध)

१ सप्टेंबरपासून बदलणार हे महत्त्वाचे नियम…

पंजाब नॅशनल बॅंक केवायसी अपडेट

पंजाब नॅशनल बॅंक आपल्या ग्राहकांना बऱ्याच काळापासून KYC अपडेट करण्यास सांगत आहे. केवायसी अपडेट करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट होती. त्यामुळे अजून तुम्ही KYC अपडेट केली नसेल तर जवळच्या बॅंकेशी संपर्क साधा अन्यथा तुम्ही तुमच्या खात्यातून पैसे ट्रान्सफर करू शकणार नाही.

एलपीजीच्या किंमतीत बदल

सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. LPG गॅसच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. एलपीजी गॅसचे दर प्रति सिलिंडर 100 रुपयांनी कमी झाले आहेत. मात्र ही कपात केवळ व्यवसायिक गॅस सिलिंडरच्याच दरात करण्यात आली आहे

टोल टॅक्स वाढणार

तुम्ही दिल्लीला जाण्यासाठी यमुना एक्सप्रेस मार्गाने जाणार असाल तर १ सप्टेंबरपासून अधिक टोल टॅक्स भरावा लागणार आहे. नवीन नियमांनुसार कार, जीप, व्हॅन आणि हलक्या मोटार वाहनांसाठी टोल दर प्रति किमी २.५० रुपये वरून २.६५ किमी करण्यात आला आहे. प्रति किलोमीटर १० पैशांची वाढ झाली आहे. तर बस किंवा ट्रकचा टोल दर ७.९० रुपये प्रति किमीवरून ८.४५ रुपये प्रति किमी करण्यात आला आहे. यापूर्वी २०२१ मध्ये यमुना एक्स्प्रेसच्या टोलमध्ये वाढ करण्यात आली होती.

टॅक्सीचालकांच्या मनमानीला चाप 

जास्त भाडे घेणे किंवा जवळच्या ठिकाणी जाण्यास नकार देणे यावरून प्रवासी आणि टॅक्सी चालकांमध्ये नेहमी वादाचे प्रसंग निर्माण होतात. अशा परिस्थितीत तुम्हाला साध्या किंवा App आधारित टॅक्सी चालकांविरोधात तक्रार करायची असल्यास तुम्ही ताडदेव प्रादेशिक परिवहन कार्यालयाने(RTO) जारी केलेल्या ९०७६२०१०१० या क्रमांकावर तक्रार करू शकता. दोषी चालकावर चौकशीअंती वाहन परवाना किंवा अनुज्ञप्ती(लायसन्स) निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे. याची अंमलबजावणी १ सप्टेंबरपासून करण्यात येणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.