ठाणे येथील देसाई खाडीच्या हद्दीत येत असलेल्या उल्हास नदीच्या (Ulhas River) पात्रात प्रक्रिया न करता सांडपाणी सोडण्यात येत असल्याप्रकरणी मुंब्रा येथील एका सामाजिक कार्यकर्त्याने हरित लवादाकडे दाद मागितली होती. वर्षानुवर्षे अशा प्रकारे सांडपाणी सोडण्यात येत असल्याने पर्यावरणाची हानी झाली असून ही भरपाई भरून काढण्यासाठी १०२.४ कोटी रुपये हानीभरपाई देण्याचे आदेश पुणे हरित लवादाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले आहेत. ठाणे (Thane) महानगरपालिकेला हा दंड ठोठावला.
२७ सप्टेंबर या दिवशी या संदर्भात झालेल्या सुनावणीमध्ये हरित लवादाने हे आदेश दिले आहेत. याचिकाकर्त्यांच्या अर्जावर सुनावणी देतांना न्यायमूर्ती दिनेश कुमार सिंग आणि तज्ञ सदस्य विजय कुलकर्णी यांच्या खंडपिठाने २ महिन्यांच्या आत बोर्डाकडे रक्कम जमा करण्याचे आदेश दिले आहेत.
(हेही वाचा – Cyber Crime : आरोग्य सल्लागार असलेल्या महिलेची पावणे सहा कोटींची ऑनलाइन फसवणूक, पुण्यातून एकाला अटक)
सामाजिक कार्यकर्ते आरिफ इराकी यांनी मुंब्रा (Mumbra) येथून उल्हास नदी आणि देसाई खाडीत सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे होणारे गंभीर जलप्रदूषण आणि आरोग्याच्या समस्यांबाबत हरिद लवादाकडे अर्ज केला होता. ठाणे महानगरपालिकेच्या म्हणण्यानुसार, मुंब्रा येथे दररोज 35 दशलक्ष लिटर (एमएलडी) सांडपाणी तयार होते, त्यापैकी 30 एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. दरम्यान, खाजगी संकुलातील 10 लहान सांडपाणी प्रक्रिया केंद्रांद्वारे (STP) 1.5 एम.एल.डी पाण्यावर प्रक्रिया केली जाते.
32 एमएलडी सांडपाण्याची निर्मिती
दिवा येथे सध्या 32 एमएलडी सांडपाण्याची निर्मिती होते. मात्र अद्याप एसटीपीची प्लांट या ठिकाणी सुरु करण्यात आलेला नाही. खाजगी संकुलांमध्ये 14 एसटीपी आहेत, जे सुमारे 5.8 एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करत आहेत. तर शिल्लक मुख्यतः सेप्टिक टाक्या आणि भिजवलेल्या खड्ड्यांमध्ये प्रक्रिया केली जात असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. अतिरिक्त प्राथमिक प्रक्रिया केलेले पाणी जवळच्या नाल्यांमध्ये सोडले जाते.
वर्षानुवर्षे अशाप्रकारे सांडपाणी सोडण्यात येत असल्याने पर्यावरणाची हानी झाली असून ही भरपाई भरून काढण्यासाठी 102.4 कोटी रुपये दंड आकारण्यात आला आहे. (Thane)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community