मल जल प्रक्रिया केंद्राला गती नाहीच…

168

मुंबई महापालिकेने चालू आर्थिक वर्षातील मल नि:सारण प्रकल्प आणि प्रचलन आदींसाठी भरीव तरतूद केली असली तरी यापैकी सात मज जल प्रक्रिया केंद्रासाठी सुमारे १,३४० कोटींची तरतूद असली तरी प्रत्यक्षात या प्रकल्पांच्या कामाला सुरुवातही न झाल्याने यावरील कोटी रुपयांचा खर्चच झालेला नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मज जल प्रक्रिया केंद्राचे भूमीपूजन केले असले तरी प्रत्यक्षात कामाला सुरुवात न झाल्याने याकरता तरतूद केलेल्या कामांवर शंभर कोटींवर खर्च न होण्याची शक्यता आहे. या तुलनेत आगामी वर्षभरात यासाठी भरीव तरतूद केली जाण्याची शक्यता असल्याने त्यावरील खर्चही वाढला जाईल,असे बोलले जात आहे.

७ ठिकाणी मलजल प्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार

मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई मलनिःसारण प्रकल्प या खात्याद्वारे वरळी, वांद्रे, धारावी, वर्सोवा, मालाड, भांडुप व घाटकोपर या ७ ठिकाणी मलजल प्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार आहेत. या सातही मलजल प्रक्रिया केंद्रांची एकत्रित क्षमता ही दररोज २४६.४० कोटी लीटर अर्थात २ हजार ४६४ दशलक्ष लीटर मलजलावर प्रक्रिया करण्याची असणार आहे. कार्याअंतर्गत प्राथमिक व दुय्यम प्रक्रियांसह तृतीय स्तरीय प्रक्रियाही केली जाणार आहेत. यासोबतच यातून बाहेर पडणाऱ्या बायोगॅसपासून वीजनिर्मितीही केली जाणार आहे. तर बाहेर पडणाऱ्या गाळावर ‘अ’ दर्जाअंतर्गत प्रक्रिया करण्यात येणार आहे.

(हेही वाचा ५ फेब्रुवारीच्या हिंदू जन आक्रोश मोर्च्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका; शुक्रवारी निर्णय)

२६ हजार कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावांना मंजुरी

महानगरपालिकेकडून मुंबई महानगरात वरळीमध्ये (५०० दशलक्ष लीटर प्रतिदिन), वांद्रे येथे (३६० दशलक्ष् लीटर प्रतिदिन) मालाडमध्ये (४५४ दशलक्ष लीटर प्रतिदिन) घाटकोपरमध्ये (३३७ दशलक्ष लीटर प्रतिदिन) धारावीमध्ये (४१८ दशलक्ष लीटर प्रतिदिन) भांडुपमध्ये (२१५ दशलक्ष लीटर प्रतिदिन) आणि वेसावे (वर्सोवा) येथे (१८० दशलक्ष लीटर प्रतिदिन) याप्रमाणे एकूण ७ केंद्र उभारणे नियोजित आहे. त्यासाठी सुमारे २६ हजार कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावांना मंजुरी दिल्यानंतर मागील महिन्यात पंतप्रधानांच्या हस्ते भूमीपूजन केल्यानंतर कामाला सुरुवात केली. या सर्व मल जल प्रक्रिया केंद्रासाठी चालू आर्थिक वर्षांसाठी १३४० कोटी रुपयांची तरतूद केली आहे,

मलवाहिन्या टाकण्याच्या कामाला गती मिळालेली नाही

ऑगस्ट २०२०मध्ये प्रथम यासाठी निविदा मागवण्यात आली होती, तेव्हापासून या प्रकल्पांसाठी भरीव तरतूद केली जात असून यंदाही या प्रकल्पाला सुरुवात न झाल्याने यासाठीची तरतूद निधी खर्च तेवढ्या प्रमाणात होणार नाही. तसेच बोरीवली ते मालाड येथील मल जल बोगद्याच्या कामाला सुरुवात झाली असली तरी गोरेगाव ते मालाड आयपीएस या बोगदा प्रकल्पाला सुरुवात झालेली नाही. याशिवाय मिठी नदी, दहिसर नदी, पोईसर नदी, वालभट तसेच ओशिवरा नदीमध्ये मल जल रोखण्यासाठी मल जल रोखण्यासाठी मलवाहिन्या टाकण्याच्या कामाला गती मिळालेली नाही. याशिवाय मलनि:सारण प्रचालन खात्यांतर्गत करण्यात येणाऱ्या कामांसाठी १९५ कोटी रुपयांची तरतूद केली असली यासाठी आवश्यक यंत्र सामुग्री खरेदीही करण्यात न आल्याने यासाठीचा निधीही खर्च होऊ शकलेला नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.