मिठी नदीमध्ये जमा होणारे मलजल हे घाटकोपर येथील प्रक्रिया केंद्राकडे वळवण्याचा आधी निर्णय घेतला होता. परंतु आता यामध्ये बदल करुन हे मलजल धारावी केंद्राकडे वळवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मिठी नदी ते धारावी मलजल प्रक्रिया केंद्र असा सुमारे ६.७ किमी. लांबीचा बोगदा बनवण्यात येणार आहे. यासाठी नेमलेल्या सल्लागार मेसर्स आय.व्ही.एल इंडिया एन्वायरन्मेंट आर अँड डी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने सूचवलेल्या पर्यायाने मिठीतील हे मलजल घाटकोपर ऐवजी धारावीकडे वळवण्याचा निर्णय घेतला आहे.
चार टप्प्यात उपाययोजना
मिठी नदीचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे ७२९५ हेक्टर असून, पावसाळ्यात पवई व विहार तलावाचे अतिरिक्त पाणी मिठी नदीतून प्रवाहित होते. तसेच १२ महिने आजूबाजूच्या परिसरातील मलजल व औद्योगिक सांडपाणीही मिठी नदीतून प्रवाहित होते. मिठी नदीतून प्रवाहित होणाऱ्या मलजलाचा प्रतिबंध करण्यासाठी व्यवहार्यता अहवाल व तपशीलवार प्रकल्प तयार करण्याचे काम एफ.पी. प्रोजेक्ट मॅनेजमेंट या सल्लागाराला दिले होते. त्यानुसार त्यांनी चार टप्प्यात अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना सुचवल्या होत्या. यामध्ये टप्पा-४ अंतर्गत बापट नाला व सफेद पूल नाला यामध्ये पावसाळा व्यतिरिक्तच्या मोसमामध्ये प्रवाहित होणारा सांडपाण्याचा अर्थात मलजलाचा प्रवाह सुरुवातीला १६८ दशलक्ष लिटर क्षमतेच्या बोगद्यावाटे घाटकोपर येथील मलजल प्रक्रिया केंद्रात वळवण्यात येणार होते. परंतु या पर्यायाची व्यवहार्यता तपासल्यानंतर प्रत्यक्ष अडचणींमुळे हा पर्याय अंमलबजावणीसाठी योग्य नसल्याचे आढळून आले.
(हेही वाचाः कांदिवलीच्या ईएसआयएस रुग्णालयात सरकार नाही, महापालिका करणार आयसीयूचा खर्च)
म्हणून घेतला निर्णय
त्यानंतर मुंबई मलनि:स्सारण प्रकल्प विभागामार्फत सल्लागार मेसर्स आय.व्ही.एल इंडिया एन्वायरन्मेंट आर अँड डी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला विविध पर्यायांची हाताळणी करुन योग्य पर्यायय सूचवण्यासाठी विनंती करण्यात आली. त्यानुसार या सल्लागार कंपनीने ५ पर्यायांची हाताळणी केली. त्यानुसार योग्य पर्याय निवडून त्यासाठी मंजुरी घेण्यात आली. या पर्यायानुसार बापट नाला व सफेद पूल नाला येथील मल प्रवाह हा घाटकोपर ऐवजी धारावी मलजल प्रक्रिया केंद्रात वळवण्याचा निर्णय घेण्यात आला.
या कंपन्यांची निवड
मिठी नदी ते धारावी मलजल प्रक्रिया केंद्रापर्यंतच्या बोगद्याचे काम कांदळवनाच्या खालून जाणार आहे. या बोगद्याचे काम जमिनीखाली २५ मीटर खोलवर केले जाणार आहे. तसेच कांदळवनासह सर्व पर्यावरण परवानगी घेण्यात आल्या आहेत. या सर्व बोगद्याच्या कामासाठी ४९९ कोटी रुपयांच्या या कंत्राट कामांसाठी जे.कुमार आणि मिशिगन या संयुक्त भागीदारीतील कंपनीची निवड झाली आहे.
(हेही वाचाः महापालिकेने किती खरेदी केले लिक्विड सिलिंडर? वाचा…)
Join Our WhatsApp Community