Sewing Machin : शिवण यंत्रांचे दर झाले कमी, पण घरघंटीची रक्कम तेवढीच

शिवण यंत्र, घरघंटीच्या दरातील तफावतीच्या निर्णयावरून गोंधळाचे वातावरण.

293
Sewing Machin : शिवण यंत्रांचे दर झाले कमी, पण घरघंटीची रक्कम तेवढीच
Sewing Machin : शिवण यंत्रांचे दर झाले कमी, पण घरघंटीची रक्कम तेवढीच
विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबई महापालिकेच्या नियोजन विभागाच्या माध्यमातून गरजू महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी शिवणयंत्र (Sewing Machin) आणि घरघंटीसह मसाला कांडप यंत्र वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या यंत्रांसाठी निश्चित केलेली रक्कम कमी करण्यात आल्यानंतर याचे आदेश प्रत्येक वॉर्डातील लेखा अधिकाऱ्यांपर्यंत न पोहोचल्याने या यंत्रांच्या एबीआय कार्ड बनवण्याच्या कामांत गोंधळात गोधळ निर्माण झाल्याचे ऐकायला मिळत आहे. (Sewing Machin)

महिला लाभार्थ्यांचे सक्षमीकरण

मुंबई महापालिकेच्या नियोजन विभागाच्यावतीने सन २०१८-१९ च्या आर्थिक वर्षापासून पात्र महिलांना स्वयंरोजगार या घटकांतर्गत बचत गट तथा महिलांना स्वयंरोजगारासाठी (सॅनिटरी पॅड, शिवणकाम (Sewing Machin), घरघंटी, मसाला कांडप यंत्र व खाद्यपदार्थ बनविण्याचा संच) यंत्रसामुग्री खरेदी करिता महाराष्ट्र शासनाच्या थेट लाभ हस्तांतरण धोरणान्वये अनुदान देण्यात येत आहे. मुंबईतील महिलांची परिस्थिती कोविड प्रादुर्भावामुळे खालावलेली असल्यामुळे संपूर्ण मुंबईमधून गरीब व गरजू महिलांना लघु व्यवसायाकरीता शिलाई मशिन, घरघंटी, मसाला कांडप यंत्र इत्यादी प्रकारची यंत्रसामुग्री उपलब्ध होण्याच्या दृष्टीने योजना आखण्यात आली. जेणेकरून गरीब व गरजू महिला स्वयंरोजगार करुन आपली उपजिवीका पूर्ण करु शकतील. त्यामुळे सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या जेंडर बजेटच्या पात्र महिलांसाठी स्वयंरोजगार या घटकांतर्गत महिला लाभार्थ्यांचे सक्षमीकरण व जीवनमान उंचावण्याच्या उद्देशाने शिवणयंत्र – ३१७८० , घरघंटी – ३१७८० आणि मसाला कांडप – ४५४ असे एकूण ६४०१४ गरीब व गरजू महिला लाभार्थ्यांना लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे.

मात्र, या यंत्र खरेदीसाठी लाभार्थ्यांना देण्यात येणारी रक्कम निश्चित करताना उत्पादक कंपनीच्या वतीने देऊ केलेल्या दराच्या तुलनेत अधिक असल्याने याची दखल घेत महापालिका आयुक्त व प्रशासक इक्बालसिंह चहल यांनी घेतलेल्या बैठकीत याचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शिवण यंत्राचा दर सुमारे दोन हजार रुपयांनी कमी झाले असून घरघंटीचे दर कायम ठेवले आहे. त्यामुळे कमी केलेल्या दरात यंत्रांची संख्या वाढवून लाभार्थ्यांची संख्या वाढवण्याचा प्रयोग प्रशासनाने केला आहे. त्यानुसार शिवण यंत्रांची (Sewing Machin) संख्या ३१, ७८० च्या तुलनेत ३७, ४५५ एवढी केली आहे, तर घरघंटीची संख्या ३१,७८० एवढी कायमच ठेवली आहे, तर मसाला कांडप ४५४ एवढीच आहे.

(हेही वाचा – Nationalist Congress: आता तुतारी वाजेल की हवा निघेल? भाजप नेत्याने लगावला टोला)

कुठल्याही दुकानांमधून या यंत्रांची खरेदी करणे आवश्यक

महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार शिवण यंत्रांची रक्कम कमी केल्यानंतर लाभार्थ्यांची संख्या वाढवण्याचा घेतलेला निर्णय हा खालच्या स्तरापर्यंत पोहोचलेला नाही. शिवण यंत्रांची (Sewing Machin) संख्या कमी केल्याने याची अधिकृत मंजुरी किंवा तसे आदेश वॉर्डातील लेखा अधिकाऱ्यांपर्यंत न पोहोचल्याने या यंत्राच्या खरेदीसाठी महापालिकेच्यावतीने एसबीआयची कार्ड बनवण्याची प्रक्रिया लांबली गेली आहे. लेखा अधिकाऱ्यांकडे मंजुरीचे आदेशच न पोहोचल्याने एसबीआय ची कार्ड बनवण्याबाबतच गोंधळाचे वातावरण पसरले गेले आहे. लाभार्थ्यांनी ५ टक्के रक्कम भरुन या यंत्र खरेदीचे कच्चे बिल अर्थात इनवॉईस सादर केल्यानंतर महापालिकेच्यावतीने एसबीआयचे कार्ड लाभार्थ्यांला वितरीत केले जाते, त्याद्वारे लाभार्थी दुकानदार किंवा अधिकृत विक्रेते यांच्याकडून शिवणयंत्र किंवा घरघंटी खरेदी करून शकतात. मात्र, या एबीआयच्या कार्डच्या आधारे कुठल्याही दुकानांमधून या यंत्रांची खरेदी करणे आवश्यक असतानाच काही वर्षी मोजक्याच दोन ते तीन कंपन्यांकडून सर्व लाभार्थ्यांनी यंत्रांची खरेदी करण्याचा प्रयत्न केल्याने योजनेबाबतच शंका उपस्थित केली जात असल्याचे ऐकायला मिळत आहे. (Sewing Machin)

येत्या २८ फेब्रुवारीला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या यंत्राचे वाटप लाभार्थ्यांना वाटप केले जाण्याचे नियोजन असून प्रत्यक्षात वॉर्ड स्तरावरच लेखा अधिकाऱ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण पसरल्याने प्रत्यक्षात या यंत्रांचा लाभ किती लाभार्थ्यांना मिळणार आणि पंतप्रधानांच्या हस्ते ही यंत्रे स्वीकारण्याचे भाग्य किती महिलांना लाभणार याकडेच सर्वांचे लक्ष आहे. (Sewing Machin)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.