नांदेडमधील (Nanded) वाघी रोड हस्सापूर (Waghi Road Hassapur) येथे दार-ए- अरखांम नावाच्या मदरशात शिकणाऱ्या १० वर्षीय मुलावर मौलानाकडून अनैसर्गिक अत्याचार करण्यात आले आहेत. पीडित मुलाच्या कुटुंबियांच्या तक्रारीनंतर मौलानाविरोधात वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Sexual Assault)
( हेही वाचा : Nashik पालकमंत्री पदावरून महायुतीत खटके उडण्याची शक्यता!)
नांदेडच्या वाघी रोड हस्सापूर येथील दार-ए- अरखांम मदरशात जवळपास ३० मुले निवासी पद्धतीने धार्मिक शिक्षण घेत आहेत. या मुलांना मूळचा बिहरचा असलेला २६ वर्षांचा मौलाना मोहम्मद शाहनवाज धार्मिक शिक्षण देत असे. मात्र दि. २६ नोव्हेंबर रोजी मौलाना मोहम्मद शाहनवाज याने दहा वर्षीय मुलांवर अनैसर्गिक लैगिक अत्याचार केले. पीडित मुलाने त्रास होत असल्याने मदरशाशेजारील टपरीचालकाला घडलेल्या घटनेबद्दल सांगितले. त्यानंतर प्रकरणाची माहिती कुटुंबियांना मिळाली. (Sexual Assault)
दरम्यान पोलिसांनी कुटुंबियांच्या तक्रारीनंतर आरोपी मौलाना शाहनवाज सह मदरसा चालक मौलाना अय्युब खासमी विरोधात वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मात्र दोन्ही आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. (Sexual Assault)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community