Sexual Assault in church : मग कोण ख्रिस्ती धर्माचा आदर करेल?

122

हिंदू संतांवर जेव्हा कथित महिला अत्याचाराचे आरोप होतात, तेव्हा अवघ्या हिंदू धर्माला बदनाम करण्यासाठी निधर्मवादी एकवटतात, पण चर्चचे पाद्री लहान मुले-मुली आणि असहाय्य गरीब महिलांवर अत्याचार करतात, तेव्हा हे लोक मूग गिळून असतात. कॅथोलिक पंथाचे सर्वोच्च म्हणजे पोप फ्रान्सिस यांनीच एका सभेत या विषयाला वाचा फोडली. नन्स आणि फादर (पाद्री) हे अश्लिल (पॉर्न) व्हिडिओ पहातात आणि लैंगिक अत्याचार करतात. धर्मगुरुच जर लैंगिक अत्याचार, अनाचार करतील, तर मग कोण त्या धर्माचा आदर करेल?

चर्च आता धर्मादाय आयुक्तांच्या नियंत्रणाखाली आणावीत

धर्मप्रमुख म्हणून त्यांना वाटणारी काळजी रास्त आहे. वासनांधता वाढायचे कारण केवळ लैंगिक व्हिडिओ पहाणे, लैंगिक वाङ्मय वाचणे हे नाही. अशा दुष्प्रवृत्ती धर्मगुरु, धर्ममार्तंडामध्ये असू नयेत, ही अपेक्षा रास्त आहे. या दृष्टीने पोप फ्रान्सिस यांनी गंभीर दखल घेणे, हे प्रशंसनीय पाऊल आहे. असे प्रकार केवळ गरीब देशात होतात असेही नाही. जर्मनीसारख्या सधन आणि सुशिक्षित देशातही अशी प्रकरणे घडली आहेत. पुणे येथे १३ वर्षीय मुलावर पाद्री व्हिन्सेट परेरा अनैसर्गिक अत्याचार करायचे. पीडित मूलगा भयाने व चर्चकडून मिळणाऱ्या मदतीतून आलेल्या मिंधेपणामुळे गप्प होता. नंतर असह्य झाल्यावर आई-वडिलांना बोलला. ते पोलिसात तक्रार नोंदवायला गेले, पण पोलिसांनी टाळाटाळ केली. सामाजिक कार्यकर्त्यांनी पाठपुरावा केल्यानंतर पाद्री परेरा गजाआड झाला, अशी शेकडो प्रकरणे घडत आहेत, याला एकच पर्याय आहे, चर्च आता धर्मादाय आयुक्तांच्या नियंत्रणाखाली आणावीत.

– डॉ. विजय जंगम, कार्याध्यक्ष, अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघ

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.