उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथील मेडिकल स्टोअर चालवणाऱ्या ५२ वर्षीय शब्बीर अहमदने एका अल्पवयीन मुलीला स्वत:च्या वासनांचे शिकार बनवले आहे. शब्बीरला (Shabbir) तीन अपत्य असून त्याने पीडितेला जिवे मारण्याचाही प्रयत्न केला. यावेळी पीडितेला वासनांध आरोपीच्या ताब्यातून दुकानाचे शटर तोडून सोडवण्यात आले. तसेच लोकांनी आरोपीच्या दुकानाला घेराव घालत गोंधळ घातला. पोलिसांनी शब्बीरला पॉक्सो कायदा (POCSO Act) आणि इतर कलमांखाली अटक करण्यात आली आहे.(Sexual Assault)
( हेही वाचा : विधानसभा अध्यक्ष Rahul Narvekar यांची भूमिका समन्यायी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिनंदन)
हे प्रकरण दि. ७ डिसेंबर रोजी नन्हारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडले. पीडित अल्पवयीन मुलगी इयत्ता सहावीमध्ये शिक्षण घेत होती. घडलेल्या घटनेदिवशी ती शब्बीरच्या दुकानाजवळून जात असतान शब्बीरने (Shabbir) मुलीला आत बोलावून शटर बंद केले. यावेळी अल्पवयीन पीडितेवर अगणित अत्याचार केला. त्यावेळी पीडितेचा गळा दाबत खून करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शब्बीरने तिचे हात पाय बांधत तोंडात कापडाचा बोळा कोंबला. या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळताच अनेकांनी मेडिकल स्टोअरला घेराव घातला. त्यानंतर पोलीस हे घटनास्थळी पोहोचले. यावेळी शब्बीरला अटक करण्यात आल्याची माहिती आहे. (Sexual Assault)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community