Shahajiraje Samadhi : औरंगजेबाच्या कबरीसाठी साडेसहा लाख रुपये; शहाजीराजेंची समाधी मात्र दुर्लक्षित

61

मोगल, निजाम, आदिलशाही अशा पातशहांचे मांडलिकत्व झुगारून हक्काचे, सामान्य रयतेचे राज्य यावे, यासाठी स्वराज्याची संकल्पना मांडणारे आणि आपल्या पुत्राला म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांना त्यासाठी प्रेरणा देणारे शहाजीराजे भोसले (Shahajiraje Samadhi) यांची समाधी दुर्लक्षित अवस्थेत आहे. शहाजीराजे भोसले यांची समाधी कर्नाटकातील होदिगेरे (जि. दावणगिरी) येथे उघड्यावर आहे. ही समाधी केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारित आहे. जे केंद्रीय पुरातत्व खाते (Archaeological Survey of India) औरंगजेबाच्या कबरीसाठी साडेसहा लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे खर्च करते, ते शहाजी राजे भोसले (Shahaji Raje Bhosale) यांच्या समाधीकडे मात्र दुर्लक्ष करते. गेल्या काही वर्षात या समाधीच्या विकासासाठी महाराष्ट्र (Maharashtra) आणि कर्नाटक (Karnataka) अशा कोणत्याही राज्यातील राजकारण्याने पुढाकार घेतलेला नाही.

(हेही वाचा – Nagpur Violence : नागपूर दंगल प्रकरणावर नितेश राणे यांचा हल्लाबोल; “जिहादी मानसिकतेच्या कारट्यांना चोप देणार”)

शहाजीराजेंची कर्मभूमी कर्नाटक

आदिलशाहीत शहाजीराजेंकडे बंगळूर आणि कर्नाटकची जबाबदारी होती. होदिगेरे हे गाव दावणगिरीपासून ५३ किलोमीटरवर आहे. या गावात शहाजीराजे यांची समाधी आणि त्यांचा वाडा आहे. समाधी मुख्य रस्त्यालगत आहे. ती सुमारे अर्धा एकर जागेत आहे. समाधीच्या चारही बाजूंनी संरक्षक भिंत आहे. शहाजीराजेंचा मुक्काम ज्या वाड्यामध्ये असायचा, तो सावकार वाडा म्हणून ओळखला जातो. तो वाडा समाधीपासून एक किलोमीटरवर भवानीदेवीच्या मंदिराजवळ आहे. २३ जानेवारी १६६४ रोजी होदेगिरीच्या जंगलात राजे शिकारीला गेले असताना त्यांच्या घोड्याचा एका वेलीमध्ये पाय अडकला व ते खाली कोसळले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला, असे सांगितले जाते. होदिगेरे येथे दरवर्षी मकर संक्रांतीला शहाजीराजेंच्या समाधीस्थळाजवळ स्थानिक शिवप्रेमींकडून आयोजन केले जाते.

आतापर्यंत काय प्रयत्न केले ?

तीन वर्षांपूर्वी ज्या वेळी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी शहाजी राजेंच्या समाधीचा संपूर्ण जीर्णोद्धार करण्याची जबाबदारी त्यांनी उचलली होती. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून पाच लाख रुपयांचा निधीही जाहीर करण्यात आला होता. तो दावणगिरी परिसरातील शहाजी राजे समाधी विकास ट्रस्टकडे देण्यात आला. मात्र, अजूनही समाधीच्या जीर्णोद्धाराचे काम सुरु झालेले नाही.

गेली साडेतीनशे वर्ष शहाजीराजेंची समाधी उघड्यावर आहे. या समाधीवर छत्र उभे रहावे, त्यांच्या वाड्याचा, भवानीमातेच्या मंदिराचा जीर्णोध्दार व्हावा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पित्याचा यथोचित सन्मान ठेवला जावा, अशी इच्छा शिवप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे. (Shahajiraje Samadhi)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.