केरळात ट्रेन जाळणा-या ‘त्या’ मुसलमानाचे काय आहे शाहिनबाग कनेक्शन?

117

केरळच्या कोझिकोड जिल्ह्यात चालत्या ट्रेनमध्ये आग लावणाऱ्या आणि तीन जणांची हत्या करणारा आरोपी शाहरुख सैफीचे शाहीनबाग कनेक्शन समोर आले आहे. तपासासाठी केरळ पोलिसांची एक टिम त्याच्या शाहीनबाग येथील घरी पोहचली. महाराष्ट्र एटीएसच्या मदतीने शाहरूखला रत्नागिरी येथे पकडले.

घटनास्थळावरून पोलिसांनी एक बॅग, डायरी आणि फोन जप्त केला आहे. फोनमधील सिम कार्डमधूनही पोलिसांना काही माहिती मिळाली. हे सिम कार्ड दिल्लीच्या जामियानगर स्थित शाहीनबागच्या पत्त्यावर घेतल्याची माहिती समोर आली आहे. ३१ मार्च २०२३ रोजी हरियाणामध्ये सिमचा वापर बंद करण्यात आला. बुधवारी केरळ पोलिस शाहरूखच्या शाहीनबाग येथील घरात पोहचली. घराची झडती घेत असतानाच त्यांनी कुटुंबाची चौकशी केली. शाहरुखच्या आई-वडिलांनी याबाबतची कोणतीच माहिती नसल्याचे सांगितले. जर त्याने कोणताही गुन्हा केला असेल, तर त्याला शिक्षा द्या असे शाहरूखचे वडील म्हणाले.

(हेही वाचा सिंहगड एक्स्प्रेसमध्ये मुसलमान काढायचा महिला, मुलींचे व्हिडिओ; प्रवाशांनी दिले पोलिसांच्या ताब्यात)

वडिलांच्या म्हणण्यानुसार, ३१ मार्च २०२३ रोजी नोएडाकडून निठारीकडे जायला निघालेला परत घरी नाही आला. यानंतर शाहरूखच्या कुटुंबानी तो हरवल्याची तक्रार केली. शाहरूख केरळला गेल्याची आम्हाला माहिती नसल्याचे कुटुंबियांनी म्हटले. रिपोर्टनुसार चौकशीसाठी शाहरुख सैफीच्या वडिलांना पोलिसांनी नेले. शाहरूखबद्दल माहिती मिळताच पोलिसांनी कुटुंबाचे नंबर देखरेखीखाली ठेवले. राञी १.३० वाजता फोन चालू झाला ज्याचे लोकेशन महाराष्ट्राच्या रत्नागिरीमध्ये दाखवले गेले. या नंतर महाराष्ट्र एटीएसकडे याची माहिती आल्यानंतर शाहरूखला रत्नागिरी स्टेशनवरुन पकडण्यात आले.

पेट्रोल टाकून लावली आग

२ एप्रिलच्या रात्री केरळच्या एका ट्रेनमध्ये प्रवाशांवर पेट्रोल टाकून आग लावण्यात आली. या घटनेत दोन वर्षांचा मुलगा आणि एका पुरूषाचा समावेश होता. तसेच आठ-नऊ जण जखमीही झाले. शाहरुखला ट्रेनमधून पळताना खूप जखमा झाल्या.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.