वर्धा ते पत्रादेवी हा शक्तीपीठ महामार्ग नागपूर आणि गोव्याला जोडला जाणार आहे. हा सर्वात प्रगत महामार्ग असून, पायाभूत सुविधा प्रकल्पांपैकी एक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नीती आयोगाच्या बैठकीत आगामी शक्तीपीठ महामार्गाचा प्रस्ताव ठेवला होता. हा महामार्ग (Shaktipeeth Expressway) महाराष्ट्रातील पूर्व, पश्चिम आणि दक्षिणेतील ३ शक्तीपिठांना जोडणारा आहे.
नागपूर-गोवा द्रुतगती महामार्गामुळे नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन हायवेची लांबीही वाढणार आहे. एक्सप्रेस वे २०२८पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे, असे अॅड. विलास पाटणे यांनी सांगितले.
ते म्हणाले की, महाराष्ट्र आणि गोवा यांच्यातील दळणवळण सुधारण्यासाठी महाराष्ट्र शासनाने शक्तीपीठ किंवा नागपूर-गोवा द्रुतगती महामार्ग बांधण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. ६ मार्गिका असणाऱ्या या महामार्गामुळे प्रवासाचा वेळ २१ तासांवरून ८ तासांवर येईल. शक्तीपीठ एक्सप्रेस वे हा महाराष्ट्रातील ११ जिल्हे आणि गोव्यातील एक यांना जोडणारा ७६० किमीचा महामार्ग असेल.
व्यावसायिक प्रकल्पांना मोठा दिलासा
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित यांच्याद्वारे बांधण्यात येणाऱ्या या मार्गामुळे मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र प्रदेश तसेच गोव्याच्या तीर्थक्षेत्रांमध्ये प्रवेश सुधारण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र सरकार नागपूर-गोवा द्रुतगती महामार्गावर हजारो झाडे, वनस्पती आणि झुडपे लावतील. शक्तीपीठ एक्सप्रेस वे हा मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, धाराशिव आणि लातूर या ६ जिल्ह्यांना तसेच विदर्भातील वर्धा आणि यवतमाळला जोडेल. सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातूनही तो जाणार आहे. ही ठिकाणे तुळजाभवानी, महालक्ष्मी मंदिरासाठी प्रसिद्ध आहेत. अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम (EPC) मॉडेलचा वापर करून शक्तीपीठ एक्सप्रेस वेसाठी ८६हजार ३०० कोटी रुपये खर्च निश्चित केला आहे. यामुळे सामाजिक सुविधा आणि रिटेल क्षेत्रामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतील. त्यामुळे या मार्गावरील व्यावसायिक प्रकल्पांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.
हेही पहा –