नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग जनतेला विश्वासात घेऊन पुढे नेणार, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिले. (CM Eknath Shinde)
शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यात प्रचंड विरोध होत असून गेल्या आठवड्यात जिल्ह्यात मोठे आंदोलन झाले. राज्याच्या सरकारमधील मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील महामार्गाला विरोध केला असून मुश्रीफ यांनी हा रस्ता रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेले स्पष्टीकरण महत्वपूर्ण मानले जात आहे. (CM Eknath Shinde)
(हेही वाचा – Amit Thackeray: उद्धव ठाकरेंच्या ‘बिनशर्ट पाठिंबा’ च्या टीकेला अमित ठाकरेंचं प्रत्त्युत्तर!)
मुख्यमंत्री म्हणाले, नागपूर-गोवा जोडणाऱ्या शक्तीपीठ महामार्गा विरोधात आंदोलन सुरु आहे. हे सरकार सर्वसामान्य जनतेचे आहे. त्यामुळे जनतेच्या भावनेचा विचार करुनच तसेच त्यांना विश्वासात घेऊनच प्रकल्प पुढे नेला जाईल. कुठलाही प्रकल्प जनतेवर थोपणार नाही अथवा रेटून नेणार नाही. समृद्धी महामार्ग हा गेमचेंजर प्रकल्प आम्ही जनतेला विश्वासात घेऊनच पूर्ण केला. त्यानुसार या शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पात ज्या ठिकाणी विरोध आहे त्याची फेरआखणी करता येईल का, याचाही विचार करीत आहोत. मात्र जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही प्रकल्प पुढे नेणार नाही, असे एकनाथ शिंदे म्हणाले. (CM Eknath Shinde)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community