मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आले. या महामार्गाचे ८८ टक्के काम पूर्ण झाले असून यातील ५२० किलोमीटरचा नागपूर ते शिर्डी टप्पा रविवारपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. लवकरच मुंबई ते नागपूर असा ७०१ किलोमीटरचा संपूर्ण मार्ग सुरू होईल.
( हेही वाचा : भारत-चीन संघर्ष; जिंगपिंग यांनी कुरापतींसाठी तवांगमध्ये नियुक्त केलेला चिनी जनरल कोण आहे?)
समृद्धी महामार्गापेक्षा खर्चिक प्रकल्प
समृद्धी महामार्गानंतर आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे पुढचे लक्ष्य ७६० किलोमीटरचा नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग असणार आहे. हा महामार्ग बांधण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला आहे. हा प्रकल्प समृद्धी महामार्गापेक्षाही मोठा आणि सर्वात जास्त खर्चिक असणार आहे. समृद्धी महामार्गावर जवळपास ५५ हजार कोटींचा खर्च करण्यात आला असून शक्तीपीठसाठी साधारण ८० हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
नागपूर ते गोवा हे अंतर केवळ १०
शक्तीपीठ महामार्गामुळे नागपूर ते गोवा हे अंतर केवळ १० तासात पार करता येणार आहे. या महामार्गाचा आराखडा तयार करण्यासाठी १२ डिसेंबरपर्यंत असलेली मुदत आता संपली असून यासाठी पुन्हा १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागातील तब्बल १२ जिल्ह्यांना जोडणारा हा प्रकल्प आहे.
Join Our WhatsApp Community