ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी हेलिपॅड उभारण्यात यावे. हेलिपॅडचे काम दर्जेदार असावे. (Shambhuraj Desai) अत्यावश्यक काळात या हेलिपॅडचा उपयोग सहजरित्या करता आला पाहिजे. हेलिपॅडला संरक्षण भिंत निर्माण करुन हेलिपॅडसाठी उच्च प्रतीच्या पेव्हर ब्लॉकचा उपयोग करण्यात यावा. तसेच आजुबाजूला डांबरीकरण करावे, अशा सूचना उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी सोमवारी दिल्या. (Shambhuraj Desai)
(हेही वाचा- Narendra Modi: पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच काश्मीर दौऱ्यावर जाणार, सुरक्षा दल ‘अलर्ट मोड’वर)
ठाणे जिल्यातील हेलिपॅड निर्मितीबाबत देसाई (Shambhuraj Desai) यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह येथे आज बैठक झाली. या बैठकीत देसाई यांनी हेलिपॅड उभारणीबाबत सूचना दिल्या. हेलिपॅडसाठी शासकीय जमीन शोधून त्याच ठिकाणी काम सुरू करावे. ज्या तालुक्यात गायरान जमीन उपलब्ध आहे, अशा ठिकाणी पुढील एक महिन्यात हेलिपॅडचे काम सुरू करावे. ज्या तालुक्यात हेलिपॅड उभारणी होणार नाही, संबंधित तालुक्याच्या प्रांताधिकारी यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असा इशारा देसाई यांनी दिला. (Shambhuraj Desai)
या बैठकीला ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा पोलीस अधीक्षक स्वामी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता आदी उपस्थित होते. (Shambhuraj Desai)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community