AI निर्मित प्रेयसीने प्रियकराला कसा घातला २४ लाखांचा गंडा?

68
AI निर्मित प्रेयसीने प्रियकराला कसा घातला २४ लाखांचा गंडा?
AI निर्मित प्रेयसीने प्रियकराला कसा घातला २४ लाखांचा गंडा?

बनावट एआय (Fake AI) प्रेयसीच्या नादात चीनमधील (China) शांघाय (Shanghai) येथे एका व्यक्तीला तब्बल २४ लाखांचा गंडा घातला गेला आहे. . एआय प्रेयसीचे नाव हे सुश्री जिओ (Sushree jio) असे नाव असून संबंधित चीनमधील पीडित व्यक्ती हा महिलेसोबत बराच काळ नातेसंबंधात होता. एआयमुळे पीडित व्यक्ती अभासी प्रेमात होता, त्याला एआय प्रेयसीबद्दल प्रेम वाटू लागले. (AI)

( हेही वाचा : अत्याचाराच्या तक्रारीत महिलेचे म्हणणे तापसाआधी ‘सत्य’ मानू नये; Kerala High Court चे निरीक्षण)

एआय (AI) प्रेयसीच्या नावाने बनावट वैद्यकीय नोंदी आणि खोटे ओळखपत्रही तयार करण्यात आले होते. त्यामुळे पीडित व्यक्तीला वाटले की, आपण खऱ्या व्यक्तीला डेट करत आहोत. या प्रकरणात घोटाळेबाजांनी एआयचा वापर करत बनावट प्रतिमा आणि व्हि़डिओ तयार करण्यासाठी एआयचा (AI) वापर केला आणि ते पीडित व्यक्तीला पाठवण्यात आले. चिनी वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित व्यक्तीला देण्यात आलेल्या छायाचित्रात एआय प्रेयसीची वेगवेगळ्या रुपे पाहायला मिळाली. (Sushree jio)

पीडित व्यक्तीने एआय (AI) प्रेयसी सुश्री जिओला (Sushree jio) कधीही प्रत्यक्ष भेटला नव्हता. तरीही त्याला एआय प्रेयसीशी असलेले नातेसंबंथ खरे वाटत होते. ज्यावेळी एआय (AI) प्रेयसीने पीडित व्यक्तीकडे २४ लाख रुपये मागितले. तेव्हा प्रेमात असलेल्या पीडित व्यक्तीने ते देऊ केले. आणि त्यानंतर ती प्रेयसी अभासी म्हणजे एआय असल्याचे कळले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एआय (AI) द्वारे तयार केलेले किंवा अनेक प्रतिमा एकत्र करून बनवलेले व्हिडिओ आणि फोटो पाठवणाऱ्या घोटाळेबाज पथकाने ऑपरेशन केले. (AI)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.