हिंदुंचे सर्वात मोठे धर्मगुरू अशी ओळख असलेल्या जगद्गुरू शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद यांचे रविवारी निधन झाले आहे. मध्य प्रदेशातील नरसिंहपूर जिल्ह्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनाबाबत संपूर्ण देशभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. वयाच्या 99व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे.
स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान
स्वामी स्वरुपानंद हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. काही दिवसांपूर्वीच त्यांचा 99वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. स्वरुपानंद स्वामी हे द्वारका आणि ज्योतिर्मठचे शंकराचार्य होते. स्वातंत्र्यसंग्रामात देखील त्यांनी सहभाग घेतला होता, तसेच अयोध्येतील राम मंदिर लढ्यात देखील त्यांचे महत्वपूर्ण योगदान होते. ज्योतिषशास्त्राचा त्यांचा गाढा अभ्यास होता.
क्रांतिकारी साधू म्हणून नावलौकिक
हिंदुंचे सर्वात मोठे अध्यात्मिक गुरू अशी त्यांची ओळख होती. अवघ्या 9व्या वर्षी घरादाराचा त्याग करुन त्यांनी धर्मप्रचाराचं काम सुरू केलो होतं. स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी 6 महिन्यांचा तुरुंगवास सोसला होता. 19व्या वर्षी ते क्रांतिकारी साधू म्हणून परिचित झाले. 1981 मध्ये त्यांना शंकराचार्य ही उपाधी मिळाली होती. त्यांच्या निधनामुळे हिंदू धर्म अभ्यासक आणि प्रचारक गमावला असल्याची भावना त्यांच्या अनुयायांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community