महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार असे चाणक्य आहेत, ज्यांनी १९९९ नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना करुन जातीयवादाचे वीष पेरले आहे. सद्यस्थितीत ओबीसी, मराठा, धनगर, आदिवासी सारख्या विविध जातींमध्ये वाद सुरु आहेत. परंतु चाणक्य शरद पवार यांनी आतापर्यंत एकही वक्तव्य केले नाही. ते केवळ जातीयवादाच्या नावावर हिंदुत्व आणि मराठी माणसाला तोडण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला.
(हेही वाचा – मोदी सरकारचा ऐतिहासिक निर्णय; RSS-संघाच्या कार्यक्रमात सरकारी कर्मचारी होऊ शकतात सहभागी)
स्थानिक शेगाव नाका येथील अभियंता भवन येथे रविवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लक्ष्य विधानसभा पदाधिकारी-कार्यकर्ता संमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला मार्गदर्शक राजू उंबरकर, प्रमुख अतिथि पप्पू पाटिल, विठ्ठल लोखंडकार, विजय राउत, आनंद एंबलवार, शहराध्यक्ष धीरजतायडे, जिल्हाध्यक्ष राज पाटिल आदी उपस्थित होते.
जातियवादाला महत्व देवू नका
संदीप देशपांडे म्हणाले की, पैसा असल्यास माजी मुख्यमंत्र्यांचा मुलगाही लग्नात नाचू शकतो. ड्रायव्हर बनू शकतो. जिल्ह्यात डॉ सुनील देशमुख, सुलभा खोडके सारख्या आमदारांना किती वेळा विजयी बनविणार. आम्हाला एक सक्षम मुख्यमंत्री द्यायचा आहे. याकरित सक्षम आमदार देणे आवश्यक आहे. पप्पू आता केवळ पास होवू नये, ‘तर तर पहिला आला पाहीजे. या शब्दात त्यांनी आगामी विधानसभामध्ये मनसेचे पप्पू उर्फ मंगेश पाटील अमरावतीमध्ये मनसेचे उमेदवार राहतील, याची घोषणा केली.
देशपांडे म्हणालेकी, मनसे संपूर्ण ताकदीने यावेळी अमरावती, विदर्भच नव्हे तर संपूर्ण राज्यात उमेदवार उतरवणार आहे. यावेळी जनतेची सरकार राहील. याकरिता जातियवादाला महत्व देवू नका. आम्हाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची शिकवण मिळाली आहे. त्यांनी जातीयवादापेक्षा मानवता धर्म मानण्याचा संदेश दिला. १९९५ मध्ये महायुतीची सरकार स्थापन झाली. त्यावेळी हिंदुत्वाकरिता सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित आले होते. परंतु महाराष्ट्राचे चाणक्य शरद पवार यांनी महायुतीपासून वेगळे होऊन स्वतःची पार्टी स्थापन करुन जातीयवादाचे विष पेरले, त्याचा परिणाम आगामी निवडणुकीत संपवायचा आहे. दुष्यंतकुमारांची कविता ‘हो गई है पीर पर्बतसी पिघलनीचाहिये…’ या ओळी त्यांनी अखेरीस सांगितल्या. राजु उंबरकर म्हणाले की, अमरावतीसह विदर्भात मनसे संपूर्ण ताकदीने उतरणार आहे. नियोजनबध्द निवडणूक धोरण निश्चीत करावे लागेल. निवडणुकीकरिता पैसा लागत नाही. जर कार्यकर्ता सक्षम असेल तर विजय नक्की होतो असेही देशपांडे म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community