राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. यावेळी राखीताई जाधव यांची मुंबई राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षा म्हणून निवड झाल्याची घोषणा शरद पवार यांनी केली शिवाय त्यांनी अजित पवार गटावरही टीका केली.
यावेळी राखी जाधव यांची निवड कार्यकर्त्यांची उमेद वाढवणारी ठरेल, असे सांगून ते पुढे म्हणाले की, मी दोन- तीन दिवसांपूर्वी वर्तमानपत्रात वाचलं की, कधी काळी आपल्याबरोबर काम करणाऱ्या लोकांनी वेगळा रस्ता स्वीकारला आहे. त्यांनीही त्यांच्या अध्यक्षाची निवड केली आहे. फरक एवढाच आहे की, तुम्ही ज्यांची निवड केली ते कधीच तुरुंगात गेलेले नव्हते. दुसऱ्या बाजूचे कुठे गेले होते हे मला माहिती नाही. मात्र, तुम्हाला तो सर्व इतिहास माहिती आहे.
(हेही वाचा – Punjab CM : भगवंत मान हे पंजाब साठी नव्हे तर केजरीवालसाठी काम करतात ,सुखबीर सिंग बादल यांचा आरोप )
आजची पक्षाची ही बैठक नवा रस्ता दाखवणारी, आत्मविश्वास देणारी आहे. याचा मला आनंद आहे. सध्या इथं आपण जयंत पाटलांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचं काम करतो आहे. मात्र, काही मित्रांनी आपल्याला दिल्लीच्या कोर्टात नेलं आहे. आपल्यावर दोन ठिकाणी खटले दाखल आहेत. एक खटला निवडणूक आयोगात आहे. तेथे सांगण्यात येतंय की, हा पक्ष त्यांचाच आहे,” असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
पुढे त्यांनी सांगितले की, आपल्यापैकी अनेकांनी भारत विरुद्ध पाकिस्तान अशी क्रिकेटची मॅच बघितली. भारताचा विजय झाला. त्या विजयात मुंबईच्या खेळाडूंचं योगदान अधिक आहे. त्यामुळे आपण आनंदी होतो.
हेही पहा –