सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) चे व्यस्थापकीय संचालक सायरस पुनावाला (Cyrus Poonawalla) यांनी बुधवारी (30 ऑगस्ट) रोजी एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि त्यांचे जिवलग मित्र शरद पवार (Sharad Pawar) यांना एक मोलाचा सल्ला दिला आहे. त्यांनी बोलताना म्हटलं आहे की, “शरद पवार यांचं वय झालं आहे, त्यांनी आता निवृत्त व्हावं.” सायरस पुनावाला हे यंदाच्या वर्षाच्या शेवटी होणाऱ्या मिस वर्ल्ड 2023 या कार्यक्रमाशी संबंधित एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्या कार्यक्रमात त्यांना अजित पवारांच्या बंडानंतर भाजप-शिवसेनेच्या सरकारविषयी प्रश्न विचारण्यात आला होता.
यावेळी बोलताना सायरस पुनावाला यांनी म्हटलं की, “शरद पवारांकडे दोनदा पंतप्रधान होण्याची संधी होती, पण त्यांनी त्या संधी गमावल्या. ते अत्यंत हुशार व्यक्तिमत्व आहेत. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान म्हणून देशाची चांगली सेवा केली असती. पंरतु त्यांच्या हातातून संधी निघून गेली.
(हेही वाचा : Bombay High Court : छत्रपती संभाजी नगर नामांतरावर ४ ऑक्टोबर रोजी मुंबई उच्च न्यायालयात होणार सुनावणी)
आता जसं माझं वय वाढतंय तसचं त्यांचही वाढतंय, त्यामुळे त्यांनी आता निवृत्त व्हावं.” शरद पवार यांनी सायरस पुनावाला यांची मैत्री सर्वांच्या परिचयाची आहे. त्यातच सायरस पुनावाला हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी देखील ओळखले जातात. त्यामुळे त्यांनी दिलेला हा सल्ला शरद पवार किती गांभीर्याने घेतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community