आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना शरद पवार (Sharad Pawar) महाजातीयवादी नेते आहेत. आरक्षणाच्या (obc reservation) बाबतीत शरद पवार यांची मोठी जबाबदारी आहे. ते राज्याचे मुख्यमंत्रीही राहिले आहेत. पण त्यांनी अनेक पदं केवळ घरातल्या लोकांना दिली. मंडल आयोग लागू होताना, शरद पवार हे मुख्यमंत्री होते. त्यासंदर्भातील कायदा आधी महाराष्ट्रात कायदा पारित झाला, त्यानंतर इतर राज्यांनी तो कायदा पारित केला, अशावेळी शरद पवार यांनी पुढे येऊन आरक्षण हे मागासवर्गीयांचे आरक्षण आहे, असं म्हणायला हवं, पण ते असं म्हणताना कुठंही दिसत नाहीत, अशी टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी केली आहे. तसेच पवार कुटुंबातील सदस्य रात्री-अपरात्री जाऊन मनोज जरांगे यांना भेटतात, असा आरोपही त्यांनी केला आहे.
(हेही वाचा – Air Marshal Amar Preet Singh हे नवीन हवाई दल प्रमुख ; ३० सप्टेंबरला स्वीकारणार पदभार)
मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नये, या मागणीसाठी लक्ष्मण हाके (Laxman Hake) हे सध्या जालन्यातल्या वडीगोद्री येथे उपोषणाला बसले आहे. 21 सप्टेंबर रोजी त्यांनी या संदर्भात माध्यमांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी शरद पवार यांना लक्ष्य केले.
शरद पवार गटाकडून धनगर समाजाला प्रतिनिधीत्व नाही
लक्ष्मण हाके (Laxman Hake) पुढे म्हणाले की, पवार कुटुंबातील सदस्य रात्री-अपरात्री जाऊन मनोज जरांगे यांना भेटतात; पण ओबीसींच्या आरक्षणाबाबत एकदाही पवार कुटुंबातील कुठं जाताना दिसून येत नाही. त्यामुळे शरद पवार हे महाजातीयवादी आहेत. शरद पवार यांच्या पक्षातील आमदार-खासदारांची यादी काढून बघितली, तर त्यात धनगर समाजाला प्रतिनिधीत्व नाही. धनगर समाजाने अनेकदा त्यांना मतं दिली आहेत. त्याशिवाय एकही खासदार संसदेत जाऊ शकत नाही. मात्र, धनगरांची मत घेऊनही शरद पवार यांनी कधीही त्यांना संपूर्ण प्रतिनिधीत्व दिलेलं नाही. जर प्रतिनिधीत्वच दिलं नाही, तर त्यांचा विकास कसा होणार ?
हेही पहा –
Join Our WhatsApp Community