उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचे असल्याने ते दिल्लीत जाऊन हातपाय जोडत आहेत. शरद पवारसुद्धा उद्धव ठाकरेंना कंटाळले आहेत. भविष्यात शरद पवार (Sharad Pawar) यांनी मला मुख्यमंत्री केले नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणतील. काँग्रेसने दिल्लीतून ठाकरे यांना परत पाठवले. संजय राऊत (Sanjay Raut) मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरेंचे नाव घेत आहेत. मात्र त्यांच्या शब्दाला आता महाविकास आघाडीत किंमत राहिली नाही, असा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला आहे. गेले अनेक दिवस उबाठा गट महाविकास आघाडीने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करावा, अशी मागणी करत आहे. त्यावरून बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी हा टोला लगावला आहे.
(हेही वाचा – Dahi Handi 2024 : दहीहंडी साजरी करताना करु नका ‘या’ चुका, अन्यथा जाल जेलमध्ये)
चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कधीही उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारणार नाही. गेल्या वेळी झाले ते झाले. आता मात्र शरद पवार यांना सुप्रिया सुळे, नाना पटोले यांना मुख्यमंत्री करायचे आहे. उद्धव ठाकरे यांनी केवळ मुख्यमंत्री पदासाठी भाजपाला सोडले. त्यामुखे काँग्रेस व शरद पवार गट उद्धव ठाकरेंना भविष्यात महाविकास आघाडीतून मोकळे करतील, असा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला. या वेळी त्यांनी बदलापूरच्या घटनेवरून विरोधी पक्षावर टीकाही केली.
हर्षवर्धन पाटील यांनी संयम ठेवावा
हर्षवधन पाटील पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांनी संयम ठेवावा. समरजित घाटगे यांनी दावा केलेली जागा अजित पवार (Ajit Pawar) गटाकडे आहे. त्यामुळे त्यांची नाराजी आहे. मात्र ज्यांना थांबायचे नाही, त्यांना आम्ही थांबवू शकत नाही, असेही बावनकुळे म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community