विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात राजकीय नेत्यांच्या जाहीर सभा होत आहेत. अशातच शरद पवारांचा इचलकरंजी येथील प्रचार सभेतील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच शरद पवारांवर (Sharad Pawar) छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अवमान केल्याची टीका ही समाजमाध्यमात होत आहे.
( हेही वाचा : भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी SriLankan Airlines ची श्रीरामकथेवर आधारित जाहिरात)
याआधी ही शरद पवार (Sharad Pawar) यांनी अनेकदा छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केला आहे. त्यांनी कधीही आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा उल्लेख केला नाही. इतकचं काय तर लोकसभेवेळी अनेक वर्षांनंतर शरद पवार रायगडावर गेले होते, अशी टीका ही त्यांच्यावर झाली. त्यामुळे महाविकास आघाडीला आणि शरद पवारांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा द्वेष का? असा सवाल उपस्थित होतो.
इचलकरंजीच्या सभेत दोनदा विनंती आणि जाहीर घोषणा करुनदेखील शरद पवार @PawarSpeaks छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार घालायला अजिबात उठले नाहीत. ढीम्म बसून राहिले.
बाकी बरोबरच आहे म्हणा, त्या वरीजिनल औरंगजेबाने तरी कुठे महाराजांचा सन्मान केला होता तो हे प्रति आलमगीर करतील?… pic.twitter.com/OCaC5nhqke
— Shefali Vaidya. 🇮🇳 (@ShefVaidya) November 15, 2024
लेखिका शेफाली वैद्य (Shefali Vaidya) यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. तसेच कॅप्शनमध्ये त्या लिहतात, इचलकरंजीच्या सभेत दोनदा विनंती आणि जाहीर घोषणा करुनदेखील शरद पवार छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) प्रतिमेला हार घालायला अजिबात उठले नाहीत. ढीम्म बसून राहिले. बाकी बरोबरच आहे म्हणा, त्या वरीजिनल औरंगजेबाने तरी कुठे महाराजांचा सन्मान केला होता तो हे प्रति आलमगीर करतील? तरीही लोक ह्याना मराठ्यांचे नेता कसे काय मानतात काही कळत नाही!, अशा शब्दात शेफाली वैद्य यांनी टीका केली आहे. (Sharad Pawar)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community