Sharad Pawar on CM Face : शरद पवारांनी फेटाळली उद्धव ठाकरेंची मागणी ; म्हणाले, मुख्यमंत्रीपदाचा निर्णय हा…

195
Sharad Pawar on CM Face : शरद पवारांनी फेटाळली उद्धव ठाकरेंची मागणी ; म्हणाले, मुख्यमंत्रीपदाचा निर्णय हा...
Sharad Pawar on CM Face : शरद पवारांनी फेटाळली उद्धव ठाकरेंची मागणी ; म्हणाले, मुख्यमंत्रीपदाचा निर्णय हा...

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि संजय राऊत यांनी जाहीरपणे पुन्हा पुन्हा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करण्याची मागणी केली आहे. शरद पवार यांनी मात्र वेळोवेळी याच्या विरोधी भूमिका घेतली आहे. ४ सप्टेंबर रोजी शरद पवारांनी कोल्हापुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याचा आता विचार करण्याचं काहीच कारण नाही, असे म्हटले आहे. (Sharad Pawar on CM Face)

मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत विचार करण्याचं आत्ताच काही कारण नाही, संख्याबळानंतर याचा विचार होईल. अनेक वेळेला असं घडलं, नेतृत्त कोणी करायचं हे निवडणूक झाल्यानंतर संख्या असेल तेव्हा निर्णय घ्यायचा असतो. अद्याप कशाचा काही ठरलेलं नाही. बहुमत नाही, बहुमत मिळेल असं वातावरण आहे, यात काही शंका नाही, पण आत्ताच काही निर्णय घेण्याची आवश्कता नाही, असे शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटले आहे.

(हेही वाचा – ST Bus Strike : एसटीच्या संपामुळे प्रवाशांची गैरसोय; कोणत्या आगाराला किती बसला फटका ?)

१९७७ ची सांगितली आठवण…

या वेळी शरद पवारांनी एक उदाहरण देखील सांगितले आहे, १९७७ साली आणीबाणीच्या नंतर निवडणूक झाली. त्या निवडणुकीला कोणालाही पुढे केलेले नव्हते. जयप्रकाश नारायण यांनी सांगितले, आणीबाणीला विरोध करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे. सर्व जण एकत्र आले, त्यानंतर निवडणुका झाल्यावर मोरारजी देसाई यांचे नाव जाहीर केले, निवडणुकीत मत मागताना मोरारजी देसाई यांचं नाव कुठेही जाहीर केलेलं नव्हतं. त्यामुळे आत्ताच नाव जाहीर केलं पाहिजे अशी काही आवश्कता नाही, आम्ही सर्वजण एकत्र बसून लोकांचा पाठिंबा मिळाल्यानंतर एक स्थिर पर्याय सरकार या राज्याला देऊ . राज्यात आमची सत्ता येईल, असे चित्र आहे. मात्र याचे नेतृत्त्व कोण करणार यावर अजूनही चर्चा झाली नाही. त्यामुळे आम्ही याचा निर्णय निवडणूक झाल्यानंतर घेणार आहोत, असं शरद पवारांनी या वेळी सांगितले आहे.

मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण ?

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. दौरे, सभा, बैठका, पक्षप्रवेश अशा घडामोडींना वेग आला आहे. अशातच या वेळी मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार याबाबत अनेकदा चर्चा रंगल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसात मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू होत्या, त्यावर याआधी देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत प्रतिक्रिया दिली होती, मात्र आज पुन्हा एकदा शरद पवारांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याचा आता विचार करण्याचं काहीच कारण नाही असं म्हटलं आहे.

दरम्यान महाविकास आघाडीत एकीकडे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा, यासाठी आग्रही आहे. (Sharad Pawar on CM Face)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.