देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन आणि धन्यवाद. गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे आभार. नाफेडने दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा घेतलेला निर्णय ऐतिहासिक आहे. पहिल्यांदाच पूर्वनिर्धारित 2410 प्रति क्विंटल दराने कांदा खरेदी करण्याचा निर्णय सरकारने घेतला, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र सरकारचे आभार मानले. कांदा प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी त्यांनी हे वक्तव्य केले.
(हेही वाचा – Talathi Exam : तलाठी भरती परीक्षेत अडथळे, टीसीएसला कारणे दाखवा नोटीस)
यावेळी मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, शेतकरी अडचणीत येतो, तेव्हा सरकार त्यांच्या पाठीशी उभे राहते. हे आतापर्यंत आपण पाहिले आहे. जेव्ही अतिवृष्टी, अवकाळी आणि गारपीट झाली, तेव्हा सरकारने सर्व नियम बाजूला ठेवले आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे सरकार उभे राहिले. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले नाही. आता या मोठ्या संकटामध्ये देखील २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. गरज भासल्यास राज्याला पुन्हा मदत करण्यासाठी केंद्र सरकार तयार आहे. मीदेखील अमित शाह आणि पियुष गोयल यांच्याशी चर्चा केली. गरज पडल्यास केंद्राकडून आणखी सहकार्य मिळेल, अशी खात्री केंद्र सरकारने दिली आहे.
कांद्याची साठवणूक क्षमता कशी वाढवता येईल, या दृष्टीने चर्चा झाली. काही निर्णय घेतले, त्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. कांदा चाळी वाढवणे, त्यांचे अनुदान वाढवणे, तसेच मोठ्या प्रमाणावर कोल्ड स्टोरेजची निर्मिती करणे आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरून नाशवंत वस्तू जास्तीत जास्त टिकवण्यासाठी शासन स्तरावर निर्णय घेतले जात आहेत. ‘कांद्याची महाबँक’ ही संकल्पना राबवत आहोत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
शरद पवारांनी राजकारण करू नये
पहिल्यांदा केंद्र सरकारने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी 2410 रुपये प्रति क्विंटल हा भाव दिला. हा ऐतिहासिक निर्णय आहे. केंद्राने निर्णय घेतला आहे. राज्य सरकार देखील यामध्ये कुठे मागे राहणार नाही. यामध्ये राजकारण न करता, शेतकऱ्यांच्या मागे उभे राहायला हवे. शरद पवारांच्या काळातही अशी परिस्थिती निर्माण झाली होती, तेव्हाही असा निर्णय सरकारने घेतला नव्हता पण आता मोदी सरकारने मदत केली. त्यामुळे यामध्ये राजकारण करू नये. केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले पाहिजे, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांना उत्तर दिले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community