इस्रायल आणि हमास यांच्यात अजूनही संघर्ष चालूच आहे. (Sharad Pawar On Palestine) अशात भारतातील राजकीय पक्षही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. १८ ऑक्टोबर रोजी शरद पवार यांनी पॅलेस्टाईनची बाजू घेतली आहे. त्यानंतर भाजपच्या नेत्यांकडून शरद पवार यांच्यावर प्रचंड टीका होत आहे. पियुष गोयल, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनीही शरद पवारांवर टीका केली आहे. ‘शरद पवार बहुदा सुप्रिया सुळेंना गाझा सीमेवर पाठवतील’, असा टोला हिमंता बिस्वा सर्मा यांनी लगावला आहे. (Sharad Pawar On Palestine)
(हेही वाचा – Rohit Sharma Fined : रोहीत शर्माला वेगाने लँबॉर्गिनी चालवल्याबद्दल दंड )
“मला वाटतं की, सुप्रिया सुळेंना शरद पवार हमासच्या दहशतवाद्यांशी लढायला गाझाला पाठवतील”, असे हिमंता बिस्वा सरमा यांनी म्हटले आहे. एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसमोर बोलतांना शरद पवार यांनी पॅलेस्टाईनची बाजू घेतली होती. ”ज्या भागात युद्ध सुरू आहे, ती जमीन ही पॅलेस्टिनी लोकांची आहे. तिथे अतिक्रमण झाले आणि इस्रायल देश उदयाला आला. मला त्याच्या खोलात जायचे नाही. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंपासून, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि अटल बिहारी वाजपेयी या सर्वांची पॅलेस्टाईनला मदत करण्याची भूमिका होती. दुर्दैवाने आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी (नरेंद्र मोदी) इस्रायलची बाजू घेतली आहे. ते करत असतांना त्या जमिनीचे मूळ मालक असलेल्या पॅलेस्टाईनकडे त्यांनी दुर्लक्ष केले आहे. त्यांची भूमिका काहीही असो; परंतु आपली म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्वच्छ असली पाहिजे”, असे शरद पवार या वेळी म्हणाले होते. (Sharad Pawar On Palestine)
शरद पवार दहशतवादी देशांच्या पाठीशी का उभे राहत आहेत ? – विनोद तावडेंचीही टीका
या प्रकरणी भाजप नेते विनोद तावडे यांनीही शरद पवार यांच्यावर टीका केली आहे ‘त्यांनी हे लक्षात घ्यायला हवे की, सध्या जगात सुरू असणारी लढाई ही दहशतवाद आणि दहशतवादविरोधी राष्ट्रे यांच्यादरम्यान सुरू आहे. अशावेळी दहशतवादी देशाविरोधात उभे राहून इस्रायलला पाठिंबा देणे क्रमप्राप्तच आहे. मुंबईत झालेले बॉम्बस्फोट, २६/११चा दहशतवादी हल्ला यांसारख्या घटना, त्यामध्ये किती लोक बळी गेले, हे सर्व शरद पवार यांनी आठवावे. असे असतानाही शरद पवार दहशतवादी देशांच्या पाठीशी का उभे राहत आहेत ? हे सर्व मतांच्या राजकारणासाठी सुरू आहे की, त्यामागे आणखी काही कारण आहे, हे जनता जाणतेच, असे विनोद तावडे यांनी म्हटले आहे. (Sharad Pawar On Palestine)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community