Sharda Peeth Demolished : पाकिस्तानने पाडले प्राचीन शारदा पीठ; ‘युनेस्को’कडे केली तक्रार

Sharda Peeth Demolished In Pakistan : शारदा पीठ हे पाकिस्तानच्या नीलम खोऱ्यातील हिंदू मंदिर आणि शिक्षणाचे प्राचीन केंद्र आहे. उत्तर प्रदेशातील दारा शिकोह फाऊंडेशनने या संदर्भात युनेस्कोकडे तक्रार केली आहे. 

211
Sharda Peeth Demolished : पाकिस्तानने पाडले प्राचीन शारदा पीठ; ‘युनेस्को’कडे केली तक्रार
Sharda Peeth Demolished : पाकिस्तानने पाडले प्राचीन शारदा पीठ; ‘युनेस्को’कडे केली तक्रार

पाकिस्तानमध्ये (Pakistan) एकामागून एक हिंदु मंदिरांना लक्ष्य केले जात आहे. नुकतेच पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीरमधील प्राचीन शारदापीठ (Sharda Peeth) मंदिर पाडले. मंदिराची भूमी बळकावून त्यावर ‘कॉफी हाऊस’ बांधण्यात आले आहे. पाकच्या सर्वोच्च न्यायालयाने या मंदिराचे संरक्षण करण्याचा आदेश देऊनही पाकने तो धुडकावून लावत मंदिर पाडले. या प्राचीन मंदिराची नोंद ‘यूनेस्को’नेही घेतली होती. ते ‘यूनेस्को’च्या संवर्धन सूचीत अंतर्भूत होते. (Sharda Peeth Demolished)

(हेही वाचा – Ajit Pawar : बारामती, सातारा, रायगड, आणि शिरूरच्या जागा लढवणारच)

युनेस्कोकडे तक्रार

शारदा पीठ हे पाकिस्तानच्या नीलम खोऱ्यातील (Neelam Valley) हिंदू मंदिर आणि शिक्षणाचे प्राचीन केंद्र आहे. उत्तर प्रदेशातील दारा शिकोह फाऊंडेशनने या संदर्भात युनेस्कोकडे (UNESCO) तक्रार केली आहे. या पत्रात म्हटले आहे की, युनेस्कोने स्वतः सांस्कृतिक वारसा घोषित केला असताना हे मंदिर पाडण्यात आले आहे. या प्रकरणी युनेस्कोच्या महासंचालकांनी स्थानिक प्रतिनिधीला बोलवावे आणि शारदा पीठ (Sharda Peeth) जतन करण्यासाठी त्याचे पुनर्वसन करावे.”

धक्कादायक बाब म्हणजे पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court of Pakistan) त्याला स्थगिती देण्याच्या सध्याच्या आदेशानंतरही या विध्वंसाला मंजुरी दिली आहे. पाकिस्तान सरकार जाणूनबुजून सांस्कृतिक वारसा असलेल्या हिंदू मंदिरांना लक्ष्य करीत असल्याचा आरोप दारा शिकोह फाऊंडेशनने (Dara Shikoh Foundation) केला आहे. तेथे आपल्या सैनिकांसाठी कॉफी हाऊस बांधण्याचे पाकचे नियाेजन आहे.

(हेही वाचा – Pune MNS : पुण्यात मनसैनिक इंग्रजी पाट्यांविरोधात आक्रमक, अनेक दुकानांवर केली दगडफेक)

पाकिस्तानच्या सिंध प्रांतात (Sindh Province) नुकतेच श्री हिंगलाजमाता मंदिर (Shree Hingalajmata Temple) उद्ध्वस्त करण्यात आले होते. श्री हिंगलाजमाता मंदिरही ‘यूनेस्को’च्या (UNESCO) संवर्धनसूचीत अंतर्भूत होते. ते एक प्राचीन शक्तिपीठही होते. याआधीही जुलै २०२३ मध्ये कराचीतील श्री मरीमातेचे मंदिर पाडण्यात आले होते. (Sharda Peeth Demolished)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.