Share Investors : महाराष्ट्राचा ‘एनएसई’वर दबदबा; आयपीओ, गुंतवणूकदारांच्या संख्येत आघाडी

118
Share Investors : राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात ‘एनएसई मध्ये आर्थिक वर्षाअखेरीपर्यंत नोंदणीकृत २,७२० कंपन्यांचे एकूण भांडवली बाजारमूल्य ४१०.८७ लाख कोटी रुपये झाले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यामध्ये ६.९ टक्के वाढ झाली आहे. एनएसईमधील एकूण आयपीओ (IPO) आणि गुंतवणूकदारांपैकी (investors) सर्वाधिक संख्या महाराष्ट्रातील असल्याचे एनएसईने म्हटले आहे. (Share Investors)
आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये नोंदणीकृत २,७२० पैकी २,११० कंपन्या या मुख्य बाजारात, तर उर्वरित ६१० कंपन्या एसएमई आयपीओद्वारा इमर्ज गटात नोंदविल्या आहेत. आर्थिक वर्षात २४२ आयपीओ बाजारात आले आणि त्याद्वारे १.७ लाख कोटी रुपये उभे करण्यात आले. २४२ पैकी मुख्य गटातील ७९ आयपीओद्वारे १.६३ लाख कोटी रुपये उभारण्यात आले. म्हणजेच प्रत्येक मुख्य आयपीओचा सरासरी इश्यू २,०५७ कोटी रुपयांचा होता, तर १६३ एसएमई कंपन्यांनी आयपीओद्वारे ७,१११ कोटी रुपये शेअर बाजारातून उभे केले. सर्वाधिक २७ हजार ८५९ कोटींचा निधी सुंदाई मोटर्सने संकलित केला.

(हेही वाचा – जम्मू-काश्मिरात धावणार पहिली Vande Bharat ट्रेन; पंतप्रधान दाखवणार हिरवा झेंडा)

७९ पैकी २८ कंपन्या महाराष्ट्रातील
मुख्य गटातील ७९ आयपीओंपैकी सर्वाधिक २८ कंपन्या वा महाराष्ट्रात नोंदणीकृत असून, त्याद्वारे ५२ हजार ६६० कोटी रुपये उभे केले. छोट्या कंपन्यांच्या गटातही कंपन्यांची संख्या आणि इश्यू साईजमध्येही महाराष्ट्र आघाडीवर आहे. महाराष्ट्रातील ५० कंपन्यांनी १,९५० कोटी रुपये उभे केले. मुख्य गटातील मुंबईतील सर्वाधिक १५ कंपन्यांनी २० हजार ७९७ कोटी, पुण्यातील सात कंपन्यांनी १९ हजार २७० कोटी, नवी मुंबईतील दोन कंपन्यांनी ११ हजार २४८ कोटी रुपये उभे केले. छोट्या कंपन्यांच्या गटातही मुंबईतूनच सर्वाधिक २९ कंपन्यांनी ९६० कोटी, पुण्यातील सात कंपन्यांनी ४३० कोटी, तर दिल्लीच्या २७कंपन्यांनी १,२३३ कोटी रुपये उभे केले.
मार्केट कॅप जीडीपी रेशो
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या भांडवली बाजारमूल्याची देशाच्या जीडीपीशी तुलना गप्पा करता येणारा मार्केट कॅप टू जीडीपी रेशो (Cap to GDP ratio) हा सध्या १२४ टक्के आहे. गेल्या तीन महिन्यांचा विचार करता एनएसईवरील सर्व शेअरचे एकूण सरासरी भांडवली बाजारमूल्य ४१०.१० लाख कोटी रुपये आहे, तर देशाचा सध्याचा जीडीपी ३३१ लाख कोटी रुपये एवढा आहे. मागच्या वर्षीचा मार्केट कॅप टू जीडीपी रेशो १२८ टक्के होता. या वर्षीच्या पडझडीमुळे त्यात चार टक्के घट झाली आहे.

(हेही वाचा – Malabar Hill मधील ट्री टॉप वॉकमुळे दोन दिवसांत ८६ हजार रुपयांची कमाई)

गुंतवणूकदारांत १६.६ टक्के वाढ
२८ मार्च २०२५ पर्यंत एनएसईकडे एकूण नोंदणीकृत गुंतवणूकदारांची (Registered Investor) संख्या ११.३ कोटी, तर एकूण खाती २१.९४ कोटी इतकी आहेत. त्यापैकी सर्वाधिक १.१४ कोटी गुंतवणूकदार महाराष्ट्रातील असून, मागील वर्षाच्या तुलनेत यात १६.६ टक्के वाढ झाली. त्याखालोखाल उत्तर प्रदेशमध्ये एक कोटी २८ लाख नोंदणीकृत गुंतवणूकदार आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.