-
ऋजुता लुकतुके
भारतीय शेअर बाजारात गुरुवारी ३ ऑक्टोबरला २ टक्क्यांची मोठी घसरण दिसून आली. मध्य-पूर्वेत युद्धाचे ढग जमा झाले आहेत. आणि इराणच्या इस्त्रायलवरील रॉकेट हल्ल्यानंतर तिथली भू-राजकीय परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे जागतिक बाजारावरच गुरुवारी पडसाद उमटले. आणि त्यात नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी निर्देशांक २.२ टक्के म्हणजेच ५४६ अंशांनी खाली आला. सलग चार दिवसांच्या घसरणीत गुंतवणूकदारांचं २ लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं. आहे. गुरुवारी बाजार बंद होताना निफ्टी निर्देशांक २२,२५० च्या खाली बंद झाला. (Share Market Bloodbath)
तर बाँबे स्टॉक एक्सचेंजच्या सेन्सेक्समध्येही (BSE SENSEX) २ टक्क्यांची घसरण होऊन निर्देशांक ८२,४९७ वर बंद झाला आहे. त्यात १,७७९ अंशांची घट झाली. मध्य-पूर्वेत इराण आणि इराक हे दोन तेल उत्पादक देश आहेत. तर सौदी अरेबिया, कतार व संयुक्त अरब अमिराती या देशांचा तेलाचा व्यापारही इराण जवळच्या खाडीतूनच चालतो. त्यामुळे तेलाच्या पुरवठ्यावर युद्धाचा विपरित परिणाम होणार असून तेलाच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारात रातोरात ४ टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे शेअर बाजारातही तेल कंपन्या, वाहन कंपन्या, बँका, वित्तीय सेवा देणाऱ्या कंपन्या आणि ग्राहकोपयोगी वस्तू बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये कमालीची मंदी दिसून आली. सेन्सेक्समध्ये मागच्या ४ दिवसांत मिळून ४ टक्क्यांची घट झाली आहे. (Share Market Bloodbath)
(हेही वाचा – Ajit Pawar : अल्पवयीन आरोपींचं वय १४ वर्षे करण्याचा विचार)
इस्त्रायल आणि हिजाबोल्ला या दहशतवादी संघटनेमधील भांडणाचं पर्यवसान सध्या छोटेखानी युद्धात झालं आहे. हिजाबोल्लाचा प्रमुख हसन नसरल्ला याला पकडण्यासाठी इस्त्रायलने इराणमधील हिझाबोल्लाच्या ठिकाणांवर हल्ले केले. आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनेही इस्त्रायलवर २०० क्षेपणास्त्रांचा मारा केला. यावर इस्त्रायलने चिडून जाऊन पुन्हा एकदा लेबनॉनवर जमिनीच्या मार्गाने हल्ला केला आहे. या सततच्या घडामोडींमुळे या प्रांतात अस्थिरता निर्माण झाली असून काहीजणांच्या मते इथं युद्धाला सुरुवात झाली आहे. (Share Market Bloodbath)
या सगळ्यामुळे जागतिक बाजारात पडसाद उमटले आहेत. आशियाई बाजार आणि युरोपातही मंदीचं वातावरण पसरल्यामुळे परदेशी गुंतवणूदकारांनाही भारतीय बाजारातून पैसे काढून घेण्याचं धोरण ठेवलं आहे. त्याचाच परिणाम म्हणून शेअर बाजार खाली आलं आहे. जाणकारांनी अशा बाजारात सावध राहण्याचाच इशारा गुंतवणूकदारांना दिला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community