दिलीप सांघवी यांच्या मालकीची फार्मा कंपनी अतिशय दिग्गज मानली जाते. फार्माच्या मार्केट कॅपने ३ लाख कोटींचा टप्पा ओलांडला आहे. स्टॉक २.५ टक्क्यांनी वाढल्यानंतर मार्केट कॅपने एवढी पातळी गाठली आहे.
नुकतेच बीएसईवर सन फार्माचा शेअर्स १,२६७.९० रुपयांच्या नवीन ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला. बीएसईवर कंपनीच्या शेअरचा ५२ आठवड्यांचा नीचांक ९२२.५५ रुपये आहे. गेल्या १ वर्षात या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना २५ टक्के परतावा दिला आहे.
(हेही वाचा – Weather Update: आठवडाभर थंडी कायम, विदर्भातही गारठा वाढण्याची शक्यता, वाचा हवामान विभागाचा अंदाज )
चालू आर्थिक वर्षाच्या (FY24) सप्टेंबर 2023 तिमाहीत सन फार्माचा कंसोलिडेटेड निव्वळ नफा 5 टक्क्यांनी वाढून 2,375 कोटी झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीने 2,262 कोटीचा निव्वळ नफा कमावला होता.
सप्टेंबरच्या तिमाहीत सन फार्माचे एकूण कामकाजातून उत्पन्न वाढून 12,192 कोटी झाले आहे, जे मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 10,952 कोटी होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community