भारतीय शेअर बाजारात (Share Market) आज, बुधवारी ४ ऑक्टोबर रोजी सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण झाली. सेन्सेक्स २८६ अंकांनी घसरला, तर निफ्टी १९,४०० वर घसरला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही (Midcap and smallcap shares ) मोठी घसरण झाली. त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे (investors) सुमारे अडीच लाख कोटी रुपये बुडाले.
सेन्सेक्समधील ३० पैकी केवळ ९ शेअर्स आज वाढीसह बंद झाले. यामध्येही नेस्ले इंडियाच्या शेअर्समध्ये सर्वाधिक २.७९ टक्क्यांची वाढ झाली आहे. यानंतर हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL),एचडीएफसी बँक, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आणि इन्फोसिसचे शेअर्स आज वधारले, तर सेन्सेक्सचे उर्वरित २१ शेअर्स आज वाढीसह बंद झाले. यामध्येही नेस्ले इंडियाच्या शेअर्समध्ये सर्वाधिक २.७९ टक्क्यांची वाढ झाली. यानंतर हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL), एचडीएफसी बँक, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आणि इन्फोसिसचे शेअर्स आज वधारले.
(हेही वाचा – Nagar Road Construction: नगरमध्ये ३१५ किमीचे रस्ते तयार होणार, प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू)
कामकाजाच्या अखेरच्या सत्रात बीएसई सेन्सेक्स २८६.०६ अंकांनी किंवा ०.४४ टक्क्यांनी घसरून ६५,२२६.०४ वर बंद झाला, तर एनएसईचा ५० शेअर्सचा निर्देशांक निफ्टी ७९.६५ अंक किंवा ०.४१ टक्क्यांच्या घसरणईसह १९,४४९.१० वर बंद झाला, तर सेन्सेक्सचे २१ शेअर्स घसरणीसह बंद झाले, यापैकी अॅक्सिस बँकेचे शेअर्स ४.३८ टक्क्यांनी घसरले. स्टेट बँक ऑफ इंडिया, एनटीपीसी, इंडसइंड बँक आणि अल्ट्राटेक सिमेंटच्या शेअर्समध्ये २.१२ ते २.८२ टक्क्यांची घसरण दिसून आली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community