देशभरातील अनेक भागात दिवाळी हे भारताचे नवीन वर्ष म्हणून साजरे केले जाते. दिवाळीत होणाऱ्या लक्ष्मीपूजनाला लोक त्यांचे घर, दुकान, कार्यालय अशा ठिकाणी श्रीलक्ष्मी देवीची पूजा करतात. जेणेकरून घर, ऑफिस, दुकान इत्यादी ठिकाणी सुख-समृद्धी कायम राहते. भारताच्या शेअर बाजारातही ही संस्कृती पाळली जाते. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर भारतीय शेअर बाजार ‘मुहूर्त ट्रेडिंग’साठी (Share Market) सायंकाळी एक तासाचे विशेष ट्रेडिंग सत्र उघडणार आहे. ही एक तासाची वेळ शेअर्समध्ये गुंतवणुकीसाठी शुभ मानली जाते.
१२ नोव्हेंबरला दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर ट्रेडिंग सत्र म्हणून भारतीय शेअर बाजार उघडला जाईल. BSE आणि NSE दोन्ही मुहूर्त ट्रेडिंग सत्र रविवारी 12 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6:00 ते 7:15 दरम्यान होतील.
(हेही वाचा – Eknath Khadse : एकनाथ खडसेंनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार; फोनवरून बोलतांना खडसे झाले भावूक )
दिवाळीच्या दिवशी शेअर बाजारात उत्साही वातावरण असते, कारण व्यापाराची वेळ खूपच कमी असली तरी सामान्यत: शेअर बाजार तेजीत असतो. 2008 पासून गेल्या 15 वर्षात 12 मुहूर्त ट्रेडिंग सत्रात तेजीसह व्यवहार झाला. 2016 आणि 2017 मध्ये सेन्सेक्समध्ये घसरण झाली होती. 2018 ते 2022 या कालावधीत गुंतवणूकदारांना फायदा झाला आहे.
दिवाळीत ट्रेडिंग दरम्यान बाजारात खूप चढ-उतार असतात. अशा परिस्थितीत यापैकी कोणत्याही शेअरमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी संशोधन करणे अत्यंत आवश्यक आहे, अशी माहिती मास्टर ट्रस्टचे एमडी हरजीत सिंग अरोरा यांनी दिली.
हेही पहा –