- ऋजुता लुकतुके
अर्थसंकल्पाच्या १ आठवडा आधी भारतीय शेअर बाजारांमध्ये चढ उतार बघायला मिळत आहेत. तर परकीय गुंतवणूकदारांचा विक्रीचा जोर कायम असल्यामुळे शेअर बाजारातील निर्देशांकांची घसरण थांबलेली नाही. अशावेळी रिलायन्स, टीसीएस असे दिग्गज शेअरही आठवडाभरात कोसळले आहेत. तसंच मोठ्या समुहातील शेअरच्या कोसळण्यामुळे रिलायन्स, अदानी यांच्यासारख्या समुहांचंही मोठं नुकसान झालं आहे. (Share Market Fall)
मागच्या तीन दिवसांत एकट्या रिलायन्स समुहाचं ७५,००० कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. तर एलआयसी आणि एसबीआयच्या भाग भांडवलातही मोठी घसरण झाली आहे. देशातील दुसऱ्या क्रमांकाची कर्जदार आयसीआयसीआय बँकेच्या भाग भांडवलातही घसरण झाली आहे. गेल्या आठवडाभरात देशातील १० सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी चार कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवल १,२५,००० कोटी रुपयांनी घसरले. यामध्ये रिलायन्स समुहाचं सर्वाधिक नुकसान झालं आहे. (Share Market Fall)
(हेही वाचा – ST Corporation ला २५ हजार नव्या लालपरी बसेस; अर्थमंत्र्यांची तत्वतः मान्यता)
दुसरीकडे, देशातील आघाडीच्या १० कंपन्यांपैकी ६ कंपन्यांचे भागभांडवल वाढलेलं दिसत आहे. या कंपन्यांच्या एकूण मूल्यांत तब्बल ५८,५५५ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. यात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश आहे. टीसीएस, एचडीएफसी, एअरटेल, एचयुएल या कंपन्यांचं बाजारमूल्य गेल्या आठवड्यात वाढलं आहे. निर्देशांकाचा अंदाज घेतला तर निफ्टी आणि सेन्सेक्स या दोन्ही निर्देंशांकांमध्ये दीड टक्क्याची घसरण गेल्या पाच दिवसांत झाली आहे. (Share Market Fall)
देशातील सर्वात मोठी सरकारी कर्ज देणारी स्टेट बँक ऑफ इंडियाचे मूल्यांकन १७,६०० कोटी रुपयांनी कमी होऊन ६,६४.३०४ कोटी रुपयांवर आलं आहे. दुसरीकडे माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचे शेअर वाढत असून या कंपन्यांचं भाग भांडवलही वाढलं आहे. इन्फोसिसचं भाग भांडवल २५,००० कोटी रुपयांनी वाढलं आहे. तर एचडीएफसी बँकेंचं बाजार मूल्यही वाढलं आहे. देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेल्या भारती एअरटेलचे बाजारमूल्य ९,००० कोटी रुपयांनी वाढून ९,३७,००० कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. टीसीएसचं बाजार मूल्यही ९,००० कोटींनी वाढलं आहे. त्याचबरोबर ग्राहकोपयोगी वस्तू बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये आयटीसी आणि हिंदुस्तान युनिलिव्हर या कंपन्यांच्या मूल्यातही वाढ झाली आहे. (Share Market Fall)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community