देशातील शेअर बाजारात सध्या दमदार तेजी पाहायला मिळत आहे. गेल्या ३ दिवसांपासून शेअर बाजार नवे उच्चांक गाठत असल्याचे दिसत आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ७० हजाराजवळ पोहोचला आहे, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी २१ हजाराचा टप्पा पार करण्याच्या जवळ आहे. हा बाजाराचा ऑल टाईम हाय निर्देशांक आहे. विशेष म्हणजे या तुफान तेजीत अनेक गुंतवणूकदारांनी जबरदस्त कमाई केली आहे.
शेअर बाजार ऑल टाईम हाय असला, तरीही कधीही मोठी घसरण होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे बाजारात आता तेजी असली, तरीही त्याचा फायदा घ्यायचा की, काही काळ थांबायचे, असा प्रश्न सामान्य गुंतवणूकदारांना पडला असल्याची चर्चा आहे.
(हेही वाचा – Rafael Nadal on Comeback : राफेल नदाल पुनरागमनासाठी तयार, पण आव्हान खडतर असल्याची कबुली)
तज्ज्ञांचा सल्ला…
बाजारात अचानक घसरण झाली, तर कमीतकमी नुकसान होईल, याची काळजी घेऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे तसेच कोणत्याही शेअरची दीर्घकाळासाठी खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांनी काही काळ थांबणे फायद्याचे ठरेल, असा सल्ला शेअर बाजारातील तज्ज्ञांनी दिला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community