- ऋजुता लुकतुके
अपेक्षित निवडणूक निकाल न लागल्यामुळे मंगळवारी मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारातही प्रत्येकी ५ टक्क्यांची घसरण झाली होती. पण, त्या धक्क्यातून बुधवारी शेअर बाजार काहीसे सावरले आहेत आणि एक्झिट पोलच्या आधीच्या स्तरावर निफ्टी आणि सेन्सेक्स हे दोन्ही निर्देशांक पोहोचले आहेत. ५ जून रोजी निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये ३.२ टक्क्यांची वाढ बघायला मिळाली. बँका, ग्राहकोपयोगी वस्तू आणि वाहन उद्योगात बुधवारी मोठी उलाढाल होता. (Share Market)
‘एकाही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यामुळे मंगळवारी शेअर बाजार थोडे गडबडले होते. पण, आता हळूहळू ते सावरतायत आणि सरकार स्थापन होईल, तोपर्यंत गुंतवणूकदारांचा विश्वासही परत येईल,’ असं शेअर खानचे संशोधन प्रमुख संजीव होटा हिंदुस्थान पोस्टशी बोलताना म्हणाले. (Share Market)
Markets back to booming today! #stockmarket #Nifty50 #Sensex pic.twitter.com/78yatCX5bI
— Nabila Jamal (@nabilajamal_) June 5, 2024
(हेही वाचा – Intelligence Survey Report ठरला ‘परफेक्ट’; ‘हिंदुस्थान पोस्ट’ने निकालापूर्वी दिले होते वृत्त)
बुधवारी शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स २,३०३ अंशांनी वाढून ७४,३८२ वर बंद झाला. तर निफ्टी निर्देशांकही ६८९ अंशांनी वधारला. २,३२१ शअरच्या किमतीत वाढ झाली. तर १,०३१ शेअरचे भाव घसरले. ४ जूनला निवडणूक निकालांच्या दिवशी दोन्ही निर्देशांकांत जवळ जवळ ६ टक्क्यांची घसरण झाली होती. फार्मा कंपनी, माहिती तंत्रज्ञान आणि ग्राहकोपयोगी वस्तू निर्मिती करणाऱ्या कंपन्या यांच्यावर येत्या काळात बाजाराची मदार असेल, असं संजीव होटा यांना वाटतं. ‘संरक्षण, बांधकाम, पायाभूत सुविधा आणि सरकारी कंपन्यांचे शेअर मागच्या दोन वर्षांत वेगाने वर चढले आहेत. आता त्यांना थोडी खिळ बसू शकते. त्यामुळे सरकार स्थापन होत नाही, तोपर्यंत आणि पुढील काही काळासाठी या कंपन्यांमधून गुंतवणूक काढून घेतलेली बरी, असं मत संजीव होटा त्यांनी व्यक्त केलं आहे. (Share Market)
बाकी शेअर बाजारातील वातावरण बुधवारी सकारात्मक होतं. ऑटो, एफएमसीजी, बँक असे अकराही निर्देशांक वर होते. पण, जोपर्यंत सरकार स्थापन होत नाही आणि महत्त्वाच्या खात्यांचं वाटप होत नाही, तोपर्यंत शेअर बाजारात सावध राहण्याचा इशारा तज्ञांनी दिला आहे. (Share Market)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community