देशभरात गुढीपाडवा अर्थात मराठी नववर्ष आणि चैत्र नवरात्र जल्लोष आणि आनंदाने साजरा होत आहे. मंगळवारी (९ एप्रिल) गुढीपाडव्यानिमित्त एनएसई आणि बीएसईवरील व्यवहार होणार शेअर बाजार गुंतवणूकदारांसाठी खुला आहे शिवाय सेन्सेक्सने ७५ हजारांचा टप्पा पार करून उच्चांकाची गुढी उभारली आहे. (Mumbai Share Market)
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शेअर बाजाराने सुसाट वेगाने तेजी गाठली. मंगळवारी शेअर बाजाराची सुरुवात होताच निर्देशांकाने मोठी झेप घेत प्रथमच 75,000 चा विक्रमी टप्पा पार केला. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकांप्रमाणेच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांकानेही तेजी घेत 22,700 या नव्या टप्पावर पोहचला. तसेच बॅक निफ्टीही 48,863 च्या टप्प्यावर पोहचला. मंगळवारी बाजाराची सुरुवात होताच सकाळी निर्देशांकाने पहिल्यांदा 75000 चा टप्पा गाठत बाजार 75,124.28 अंकांवर सुरू झालाय निर्देशांक काल दिवसअखेरी 74,742.50 अंकावर बंद झाला होता. त्यानंतर सकाळी बाजार सुरू होताच निर्देशांकाने मोठी उसळी घेतली. निफ्टीनेही 22,765.10 चा विक्रमी टप्पा गाठला आहे.
(हेही वाचा – Lok Sabha Elections 2024: राहुल गांधींच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे बीआरएसने केली तक्रार, जाणून घ्या काय आहे प्रकरण)
शेअर बाजारात 1,662 शेअर्समध्ये वाढ झाली, तर 584 शेअर्सची सुरुवात घसरणीने झाली. गोदरेज प्रॉपर्टीज, इन्फोसिस, टाटा स्टील, एचसीएल टेक्नॉलॉजीज,एक्साइड इंडस्ट्रीज आणि टाटा समुहाच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली.
हेही पहा –