शेअर बाजारातील (Share Market) प्रमुख निर्देशांकाची सुरुवात आज थोडी तेजीने झाली. बाजारात बँकिंग आणि आयटी क्षेत्रात विक्री होत आहे, तर मेटल, मिडिया आणि ऑटो क्षेत्रात खरेदी सुरू आहे.
BSE सेन्सेक्स 66,000 आणि निफ्टी 19,680 च्या पातळीवर व्यवहार करत होते. निफ्टीमध्ये आयशर मोटरचे शेअर्स २.५ टक्क्यांच्या वाढीसह सर्वाधिक वाढले आहेत. टाटा स्टिल आणि डॉ. रेड्डीजचे शेअरदेखील तेजीत आहेत, तर एशियन पेंट जवळपास एक टक्का घसरला आहे.
(हेही वाचा – ICC ODI World Cup : अक्षर पटेल ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात खेळणार नाही, अश्विनला विश्वचषकाची संधी)
‘या’ शेअर्समध्ये घसरण…
हिंदाल्को, एसबीआय लाईफ, हिरो मोटोकॉर्प, इन्फोसिस शेअर घसरले. एशियन पेंट कंपनीचे शेअर्स १.६६ टक्क्यांनी घसरून ३, २६८ रुपये प्रति शेअरवर व्यवहार करत होते. याशिवाय विप्रो, एसबीआय, मारुती, सन फार्मा, एचडीएफसी बँक, हिंदुस्थान युनि लीव्हर, इन्फोसिस, अॅक्सिस बँक, टीसीएम, बजाज फिनसर्व्ह, टेक महिंद्रा आणि कोटक महिंद्रा बँकेच्या शेअर्समध्ये घसरण झाली.
‘या’ शेअर्समध्ये तेजी…
शेअर बाजाराच्या सुरुवातील बजाज फायनान्स, टाटा कंझ्युमर, बजाज फिनसर्व्ह, अपोलो हॉस्पिटल, टाटा स्टिल, अल्ट्राटेक सिमेंट, एलटी, जेएसडब्ल्यू स्टील, एनटीपीसी, भारती एअरटेल, टायटन, टाटा मोटर्स, पॉवर ग्रिड, रिलायन्स, नेस्ले इंडिया आणि महिंद्रा अँड महिंद्रा यासारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि रोखे उत्पन्नात झालेली वाढ यामुळे गुंतवणूकदार सावध आहेत.
हेही पहा –