शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांकात आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी वाढ झाली आहे. चांगल्या जागतिक संकेतांमुळे बीएसएफ सेन्सेक्स 65,000च्या वर गेला आहे. निफ्टीदेखील 19,300च्या पुढे आहे. बाजारातील तेजीमुळे मेटल शेअर्समध्ये सर्वाधिक खरेदी होत आहे.
(हेही वाचा – CBI : सीबीआयने जाहीर केले मागील ८ महिन्यांतील घोटाळे; ८ महिन्यांत तब्बल २३,५६६ कोटींचे घोटाळे)
निफ्टीमध्ये अदानी एंटरप्रायझेसचा शेअर 3 टक्क्यांनी वाढला आहे, बजाज फायनान्सचा शेअर सर्वाधिक घसरला आहे.सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 15 शेअर्स वाढीसह तर 15 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. याचा अर्थ घसरणाऱ्या आणि वाढणाऱ्या शेअर्सची संख्या समान आहे. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 27 शेअर्स वाढीसह तर 23 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत.
रिअल्टी क्षेत्र आणि मीडिया शेअर्समध्ये वाढ
क्षेत्रीय निर्देशांकात आज, FMCG आणि IT क्षेत्र वगळता, इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक वाढीसह व्यवहार करत आहेत. FMCG 0.33 टक्के आणि IT 0.28 टक्क्यांनी घसरला आहे. वाढत्या क्षेत्रांपैकी, रिअल्टी क्षेत्र 0.98 टक्क्यांनी वर आहे आणि मीडिया शेअर्समध्ये 0.66 टक्क्यांची वाढ दिसून येत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community