शेअर मार्केट (Share Market) सध्या तेजीत आहे. विशेष म्हणजे पुढील वर्षापर्यंत सन्सेक्स ७५ हजारांची पातळी गाठेल, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. याचा परिणाम म्हणून शेअर्सच्या किमतीतही वाढ होत आहे. गुंतवणूकदारांना परतावाही चांगला मिळत आहे. यापैकी एक शेअर रॉकेट बनला आहे.
सध्या गुंतवणूकदारांची मल्टिबॅगर शेअरसह स्मॉल आणि मिडकॅप शेअरमध्ये खरेदी सुरू आहे. ऑटो, इलेक्ट्रिक वाहन आणि ग्रीन एनर्जीशी संबंधित शेअरची चलती सुरू आहे.
(हेही वाचा – World Cup 2023 Final : भारताविरुद्ध कांगारूंचे ‘हे ७ शिलेदार’ ठरू शकतात भारी)
ग्रीन एनर्जी सेक्टरमध्ये काम करणारी कंपनी सब्सिडियरी फर्म एसजेव्हीएन ली. (SJVN LEE) या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे पैसे अवघ्या ६ महिन्यांत दुप्पट झाले. त्यामुळे कंपनीला चांगल्या ऑर्डर मिळाल्याने शेअरमध्ये तेजी दिसत आहे. गेल्या शुक्रवारी हा शेअर १.२२ टक्क्यांनी वाढून ७६.०९ रुपयांवर पोहोचला.
हेही पहा –