आठवड्याच्या अखेरच्या दिवशी शेअर बाजाराची सुरुवात सु्स्तावली. बाजारातील प्रमुख निर्देशांक मंद गतीने व्यवसाय करत आहेत. कमकुवत जागतिक संकेतांमुळे काही निर्देशांक मंदगतीने व्यवसाय करत आहेत.
NSE IX वर, गिफ्ट निफ्टी 22.5 अंकांच्या किंवा 0.12 टक्क्यांच्या घसरणीसह 19,406.50 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता. यावरून दलाल स्ट्रीट शुक्रवारी नकारात्मक सुरू होण्याची शक्यता होती, मात्र सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्समध्ये 25 अंकांची वाढ झाली. त्याच वेळी निफ्टी 19,265 अंकांच्या वर व्यवहार करत होता. बाजारातील मंदीमुळे JIO Financialचे शेअर 4%नी वाढले आहेत, तर NTPCचे शेअर 1.25% ने घसरले आहेत.बीएसई सेन्सेक्स जवळपास 100 अंकांच्या वाढीसह 64,900 च्या पुढे गेला आहे. निफ्टीही 40 अंकांनी उसळी घेत 19,300 च्या जवळ व्यवहार करत आहे.
(हेही वाचा – UPI Transactions : भारतात महिन्याभरात १० अब्ज युपीआय व्यवहार )
सेन्सेक्सवर ‘या’ शेअर्समध्ये तेजी
टाटा स्टीलचा शेअर बीएसई सेन्सेक्सवर सर्वाधिक वाढीसह व्यवहार करत होता. याशिवाय पॉवर ग्रिड, टाटा मोटर्स, जेएसडब्ल्यू स्टील, एसबीआय, रिलायन्स इंडस्ट्रीज, सन फार्मा, बजाज फिनसर्व्ह, कोटक महिंद्रा बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, टेक महिंद्रा, टायटन, इंडसइंड बँक, एचसीएल टेक, अॅक्सिस बँक आणि बजाज फायनान्स हे शेअर्स वाढीसह व्यवहार करत आहेत.
सेन्सेक्सवर ‘या’ शेअर्समध्ये घसरण
सेन्सेक्सवर एनटीपीसी, मारुती, भारती एअरटेल, एशियन पेंट्स, लार्सन अँड टुब्रो, नेस्ले इंडिया आणि इन्फोसिसचे शेअर्स घसरणीसह व्यवहार करत होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community