शेअर बाजारात शुक्रवारी, (३ मे) तेजीने सुरुवात झाली, त्यानंतर दुपारी एकच्या सुमारास शेअर बाजार धडाधड कोसळला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (सेन्सेक्स) सुमारे १४००, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) ४०० अंकांनी घसरला. अचानक झालेल्या या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे ३ कोटी लाख रुपयांचे नुकसान झाले. (Share Market)
एनएसईवर नोंदणी असलेल्या २५५३ शेअर्सपैकी ७६३ शेअर्समध्ये तेजी नोंदवण्यात आली, तर १६८९ शेअर्समध्ये घसरण झाली. तर १०१ शेअरवर कोणताही परिणाम झाला नाही. जवळपास १३३ शेअर्सने ५२ आठवड्यांतील सर्वोच्च पातळी गाठली, ७ शेअर्स निच्चांकी पातळीवर पोहोचले. यासह ८७ शेअर्सला अपर सर्किट, तर ३७ शेअर्सला लोअर सर्किट लागले आहे.
(हेही वाचा – IPL 2024 SRH vs RR : हैद्राबादचा एका धावेनं विजय आणि आयपीएलमधील आणखी काही विक्रम)
घसरणीमागील कारण ?
शेअर बाजारात शुक्रवारी झालेल्या घसरणीमागील कारणही स्पष्ट झाले आहे. गुंतवणूकदारांनी नफा कमावण्यासाठी शेअर्स विक्रीचा सपाटा लावला. त्यामुळे बाजार पडला. रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक आणि आयटी शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात विक्री झाली आणि त्याचा परिणाम मार्केटवर झाला. शुक्रवारी, सर्वाधिक घसरण CEATटायर स्टॉकमध्ये ४.२ टक्के झाली. यासह ज्योती लॅब्सचा शेअर ३.६ टक्के, ब्लू स्टारचा शेअर ३ टक्के, एमआरएफचा शेअर ३ टक्के घसरला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community