शेअर बाजारात (Share Market) गुंतवणूकदारांसाठी हा आठवडा महत्त्वाचा असणार आहे. विशेषत: ज्या गुंतवणूकदारांची जोखीम उचलण्याची तयारी आहे, त्यांच्यासाठी या आठवड्याचे महत्त्व विशेष आहे.
टाटा टेक्नॉलॉजीजचा आयपीओ बुधवारी, २२ नोव्हेंबर रोजी लॉंन्च होणार आहे. या आयपीओसाठी अर्ज करण्याची मुदत २४ नोव्हेंबर असून कंपनीने प्रति शेअर ४७५-५०० रुपयांचा प्राईज बँड निश्चित केला आहे. टाटा समुहाच्या कंपनीचा यापूर्वीचा आयपीओ १९ वर्षांपूर्वी आला होता. त्यामुळे या आयपीओला कसा प्रतिसाद मिळतो, याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष आहे.
(हेही वाचा – Mumbai Metro: मेट्रो ३’चे काम अंतिम टप्प्यात, डिसेंबरमध्ये प्रवाशांच्या सेवेत दाखल)
कोणते आयपीओ उद्यापासून खुले होणार ?
२०२३-२४ या आर्थिक वर्षात दुसऱ्या सहामाहीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत देशातील अनेक कंपन्यांनी इनिशियल पब्लिक अॉफरिंग (IPO)लॉंच केले आहे. यामध्ये आता ६ नवीन कंपन्यांची भर पडली आहे. या कंपन्यांनीही त्यांचा आयपीओ भारतात आणण्याचे ठरवले आहे. सरकारी मिनी रत्न कंपनी इरेडादेखील (IRDEA IPO) स्वत:चा आयपीओ आणत आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत २१ ते २३ नोव्हेंबर आहे. गंधार ऑईल रिफायनरी इंडिया (Gamdhar Oil Refinary India IPO) ही व्हाईट ऑईल उत्पादक कंपनी आहे. या कंपनीच्या आयपीओसाठी गुंतवणूकदार २४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करू शकतात. फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेसने आपीओसाठी १३३-१४० प्राईज बँड ठेवला आहे. या आयपीओसाठी २२ नोव्हेंबरपासून अर्ज करता येईल. फ्लेअर रायटिंग इंडस्ट्रिज ही देशातील स्टेशनरी उत्पादक कंपनी आहे. त्यांनीही आपला आयपीओ बाजारात आणला आहे. यासाठी २२ ते २४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येईल. रॉकिंग डील्स सर्क्युलर इकोनॉमी (Rocking Deals Circular Economy IPO)yr B2Bरी-कॉमर्स कंपनी २२ नोव्हेंबर रोजी आपला IPO लॉंच करत आहे.
हेही पहा –