Share Market : टाटा टेक्नॉलॉजीजच्या पहिल्या आयपीओची घोषणा, गुंतवणूकदारांकडून जोरदार खरेदी

या आयपीओअंतर्गत शेअर्स खरेदीसाठी बोली लावण्याची संधी दिली जाईल.

181
Share Market : टाटा टेक्नॉलॉजीजच्या पहिल्या आयपीओची घोषणा, गुंतवणूकदारांकडून जोरदार खरेदी
Share Market : टाटा टेक्नॉलॉजीजच्या पहिल्या आयपीओची घोषणा, गुंतवणूकदारांकडून जोरदार खरेदी

टाटा समुहाने (Share Market) अलीकडेच दोन दशकांतील आपल्या पहिल्या आयपीओची घोषणा केली. २२ नोव्हेंबर रोजी म्हणजे पुढील आठवड्यात टाटा मोटर्सची  उपकंपनी टाटा टेक्नॉलॉजीज आयपीओ बाजारात लाँच केला जाणार असून २४ नोव्हेंबरपासून सबस्क्राईब करू शकतात.

तब्बल दोन दशकांनंतर टाटा समुहाच्या कंपनीच्या आयपीओ येत असून रिटेल गुंतवणूकदारांना २२ ते २४ दरम्यान या आयपीओअंतर्गत शेअर्स खरेदीसाठी बोली लावण्याची संधी दिली जाईल. टाटांच्या ऑटो कंपनीच्या शेअर्समधील तेजीचे कारण म्हणजे टाटा टेक्नॉलॉजीजचा आयपीओ मानला जात आहे. या आयपीओअंतर्गत शेअर्स खरेदीसाठी बोली लावण्याची संधी दिली जाईल. टाटा टेक्नॉलॉजीजच्या आयपीओबाबत गुंतवणूकदारांमध्ये उत्साह दिसून येत आहे. त्यामुळे टाटा मोटर्सच्या शेअर्सना सर्वाधिक फायदा होताना दिसत आहे. टाटा टेक्नॉलॉजीजच्या आयपीओचे सर्व तपशील समोर येताच गुंतवणूकदारांनी टाटा मोटर्सच्या शेअर्सची जोरदार खरेदी सुरू केले ज्यामुळे शेअरची किंमत नवीन उच्चांकावर पोहोचली. टाटा टेक्नॉलॉजीजचा आयपीओ ३,०४२.५ कोटी रुपयांचा असेल, तर कंपनीचे मूल्य २०,२८३ कोटी रुपये असेल.

(हेही वाचा – Delhi Chhath Puja : छठपूजेसाठी दिल्ली वाहतूक पोलिसांकडून मार्गदर्शक सूचना जारी)

शेअर बाजारातील आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी टाटा मोटर्सच्या शेअरनी मुसंडी मारून विक्रमी उच्चांक गाठला. कंपनीचा स्टॉक १.०९ टक्के उडी घेत ६८१.२५ रुपयांवर बंद झाला, तर दिवसभराच्या व्यवहारात शेअरने ६८७.६५ रुपयांचा उच्चांक गाठला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.