Sharmila Thackeray On Deepfake : ‘डीपफेक’वर शर्मिला ठाकरेही नाराज; म्हणाल्या, माझ्या मुलीलाही…

Sharmila Thackeray On Deepfake : माझ्या मुलीला पण युट्युबवर वाटेल तसे मेसेज टाकतात. अनेक वेळा या संदर्भात मी स्वत: पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. तक्रारीनंतर मुलांना अटकही केली जाते. मात्र आपला कायदा तकलादू असून जो ब्रिटिशकालीन आहे, असे ठाकरे म्हणाल्या.

388
Sharmila Thackeray On Deepfake : 'डीपफेक'वर शर्मिला ठाकरेही नाराज; म्हणाल्या, माझ्या मुलीलाही...
Sharmila Thackeray On Deepfake : 'डीपफेक'वर शर्मिला ठाकरेही नाराज; म्हणाल्या, माझ्या मुलीलाही...

डीपफेक (Deepfake) प्रकरणी कायद्यात बदल केला पाहिजे. (Sharmila Thackeray On Deepfake) विधानसभेने कायद्यात बदल केला पाहिजे, सरकारने कठोर पावले उचलली, तरच त्यावर उपाय निघेल, असे मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे म्हणाल्या. मुंबई येथे जैन तेरा पंथ समाजाचे राष्ट्रीय संत आचार्य श्री महाश्रमजी (Acharya Shri Mahashramji) यांचे आगमन झाले आहे. शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांनी त्यांचे दर्शन घेतले. त्या वेळी शर्मिला ठाकरे बोलत होते.

(हेही वाचा – Corona Patient: थंडीत कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय, आरोग्य मंत्रालयाकडून सावधानतेचा इशारा)

जैन समाजाचे प्रमुख पदाधिकारी मनोहर गोखरू, भूपेश कोठारी, ललित जैन आणि दीपक संदाडिया यांनी शिवतीर्थ येथे भेट घेउन राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांना राष्ट्रीय संतांना भेटण्याचे आमंत्रण दिले होते. या निमंत्रणानंतर त्या सांताक्रूझच्या एसएनडीटी महाविद्यालयात दर्शनासाठी गेल्या होत्या. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

साधू संतांचे आशीर्वाद घेणे चांगले

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनाही आमंत्रण देण्यात आले होते. ते पुण्यात असल्यामुळे येऊ शकले नाहीत. आज साहेब पुण्यात असल्यामुळे मी आले. साधूसंतांचे आशीर्वाद घेणे कधीही चांगले असते. आचार्यजी आमच्या घरी आले, तर आमचे भाग्यच असेल, असे शर्मिला ठाकरे या वेळी म्हणाल्या. (Sharmila Thackeray On Deepfake)

डीपफेक फोटोचे प्रकरण गेले काही दिवस गाजत आहे. बॉलिवूड अभिनेत्री, महिला क्रिकेटपटू रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांचे डीपफेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पंतप्रधान मोदी यांनीही डीपफेक फोटोविषयी चिंता व्यक्त केली होती. आता मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनीदेखील डीपफेक फोटोविषयी चिंता व्यक्त केली आहे.

(हेही वाचा – JP Nadda To Congress : जनतेकडून लुटलेला पैसा परत करावा लागेल; जे.पी. नड्डा यांचा काँग्रेसला इशारा)

आपला कायदा तकलादू

शर्मिला ठाकरे पुढे म्हणाल्या, ”तुम्हाला विश्वास बसणार नाही. या फेक व्हिडीओचा अनुभव मला आहे. माझ्या मुलीला पण युट्युबवर वाटेल तसे मेसेज टाकतात. अनेक वेळा या संदर्भात मी स्वत: पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. तक्रारीनंतर मुलांना अटकही केली जाते. मात्र आपला कायदा (Law of India) तकलादू असून जो ब्रिटिशकालीन आहे. त्यामुळे अटक केल्यानंतर त्यांना सोडण्यात येते. त्यामुळे कायद्यात कुठेतरी बदल केला पाहिजे. विधानसभेने कायद्यात बदल केला पाहिजे. तरच त्यावर उपाय निघेल.”

यापूर्वी अभिनेत्री रश्मिका मंदाना, आलिया भट्ट आणि कतरिना कैफ यांसारख्या अभिनेत्रींचे डीपफेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सचिन तेंडुलकर यांची मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) यांनाही विश्वचषकाच्या कालावधीत असे अनुभव आले होते. (Sharmila Thackeray On Deepfake)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.