मालवण (Malvan) येथील चिवला बीच येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय फिन्स जलतरण स्पर्धेत (finswimming championship 2024) मुंबईची शार्वी बलवतकर (Sharvi Balwatkar) हिने द्वितीय क्रमांक पटकावला. तिच्या या यशाबद्दल तिचे क्रीडा क्षेत्रात कौतुक होत आहे. 21 डिसेंबर या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत राज्यभरातून जलतरणपटू सहभागी झाले होते.
(हेही वाचा – थोर समाजसेवक Baba Amte यांच्या जन्मदिनानिमित्त जाणून घ्या ही विशेष माहिती)
११-१४ वर्षे वयोगटातील स्पर्धकांसाठी झालेल्या या स्पर्धेत ११ वर्षांच्या शार्वीने अपवादात्मक कौशल्य आणि दृढनिश्चय दाखवला. तिच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल तिला रौप्य पदक, प्रमाणपत्र आणि गुडीची बॅग देऊन तिला गौरविण्यात आले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शार्वी बलवतकरचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
शार्वी वयाच्या ८ व्या वर्षापासून जलतरण या क्रीडा प्रकारात सराव करत आहे. गोकुळधाम शाळा, गोरेगाव, मुंबई येथील महाराष्ट्र राज्य हौशी जलचर संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र पालकर यांच्या मार्गदर्शनाखाली शार्वीने जलतरणाचे प्रशिक्षण घेतले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ती यशाची पुढील शिखरे पादाक्रांत करत आहे. या यशाने शार्वीचा आत्मविश्वास आणखी वाढला असून तिचे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश मिळवण्याचे ध्येय तिने पक्के केले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community