पश्चिम बंगालमधील (West Bengal) बरुईपूर (Baruipur) शहरात शेख इंदू नावाच्या एका मुस्लिम व्यक्तीने माता शीतला देवीच्या मूर्तीची तोडफोड केली आहे. तसेच त्याठिकाणी आग लावण्याचा प्रकारही धर्मांध शेख इंदू (Sheikh Indu) याने केला. ही घटना दक्षिण २४ परगणा जिल्ह्यात घडली. जळालेल्या मूर्त्यांचे आणि तोडफोड करण्यात आलेल्या मंदिराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. स्थानिक लोकांनी हे कृत्य करणाऱ्या आरोपी शेख इंदूला पकडले. नंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
( हेही वाचा : ODI World Cup 2027 : २०२७ च्या विश्वचषकापूर्वी भारतीय संघ किती एकदिवसीय सामने खेळणार?)
माता दुर्गाच्या मूर्तीची तोडफोड केल्याच्या विरोधात भाजपा नेत्या अग्निमित्र पॉल (Agnimitra Paul) यांनी बरुईपूर पोलिस ठाण्याबाहेर निदर्शने केली. त्याच वेळी, पश्चिम बंगालमधील (West Bengal) सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress) चे आमदार बिभास सरदार यांनी या घटनेचा दोष हिंदूंवर (Hindu) टाकण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून लोकांचे लक्ष शेख इंदूच्या कृत्यावरून हटवले जाईल. त्यातच दि. ७ मार्च रोजी बरुईपूर पोलिसांनी स्वतः दावा केला की, आरोपी शेख इंदू मानसिक रोगी आहे म्हणजेच आजारी आहे. (West Bengal)
“आरोपीला स्थानिकांनी पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले,” असे पोलिसांनी X वर लिहिले. गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास सुरू करण्यात आला आहे. ताब्यात घेतलेली व्यक्ती ‘बाहेरील’ आहे आणि मानसिक रोगाने ग्रस्त आहे. पोलिसांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. परंतु जातीयवाद पसरवण्याचा आणि चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. (West Bengal)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community