अल्पवयीन Hindu मुलीशी शेखने ‘राम’ बनून केले लग्न; आरोपीने गाठला अत्याचाराचा कळस…

172
अल्पवयीन Hindu मुलीशी शेखने 'राम' बनून केले लग्न; आरोपीने गाठला अत्याचाराचा कळस...
अल्पवयीन Hindu मुलीशी शेखने 'राम' बनून केले लग्न; आरोपीने गाठला अत्याचाराचा कळस...

हरियाणातील (Haryana) करनालमध्ये (Karnal) एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी एका मुस्लिम (Muslim) तरुणाने हिंदू (Hindu) असल्याचे भासवत बिहारमधील एका १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीशी लग्न केले. आरोपीने आपले नाव राम सांगितले. पण त्याचे खरे नाव शेख (Sheikh) असल्याचे पीडितेला कळले. लग्नानंतर आरोपीने मुलीला स्पा सेंटरमध्ये नोकरी मिळवून दिली आणि तिला वेश्याव्यवसायात ढकलले. जेव्हा पीडित मुलगी अपघातात जखमी झाली तेव्हा तिला एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. आता पोलिस आणि बाल कल्याण समिती या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.

( हेही वाचा : holi special food: भारतभर होळीनिमित्त प्रसिद्ध असणाऱ्या विशेष खाद्यपदार्थाबाबत ‘ही’ माहिती अवश्य वाचा   ) 

एका वृत्तसंस्थेनुसार, पीडित मुलीने सांगितले की, मी बिहारची (Bihar) आहे. लग्नाच्या वेळी तिला वाटले की तिचा नवरा हिंदू (Hindu) आहे. पण नंतर सत्य समोर आले. शेखने (Sheikh) तिला स्पा सेंटरमध्ये काम करायला भाग पाडले. जेव्हा पीडितेला तिच्या आजाराची माहिती मिळाली. तेव्हा तिने शेखला सांगितले पण तरीही त्याने तिला तिथेच काम करण्यासाठी सोडले. पीडितेचे म्हणणे आहे की, दररोज एक किंवा दोन लोक तिच्यासोबत लैगिक संबंध ठेवायचे. दरम्यान महिला दिनानिमित्त पोलिसांनी करनालमध्ये (Karnal) एका स्पा सेंटरवर छापा टाकला, जिथे ही अल्पवयीन पीडित मुलगी त्यांना सापडली.

छापा टाकल्यानंतर, मुलीला बाल कल्याण समितीकडे आणण्यात आले. समुपदेशनादरम्यान तिने सर्व काही सांगितले. समितीचे अध्यक्ष उमेश चनाना म्हणाले की, मुलगी अजूनही धक्क्यात आहे आणि तिला बाल संरक्षण गृहात ठेवण्यात आले आहे. समिती आता मुलीच्या कुटुंबियांचा शोध घेत आहे. दुसरीकडे, शहर पोलिस ठाण्याने शेख, स्पा सेंटर संचालक आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

स्पा सेंटरच्या रेकॉर्डवरून मुलीशी संबंध ठेवणाऱ्या लोकांची ओळख पटवली जात आहे. जेणेकरून त्यांची तपासणी करून त्यांचा उपचार करता येईल. बाल कल्याण समितीला संशय आहे की, हे धर्मांतराचे (Conversion) प्रकरण देखील असू शकते. या घटनेचा संबंध लव्ह जिहादशी (Love Jihad) जोडला जाऊ शकतो, अशीही चर्चा आहे. (Hindu)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.