शर्लिन चोप्रा, पूनम पांडेला २० सप्टेंबरनंतर होणार अटक?

मुंबई उच्च न्यायालयाने राज कुंद्रा याची १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

61

पोर्नोग्राफी प्रकरणात मॉडेलिंग क्षेत्रातील कलाकारांकडून राज कुंद्राच्या विरोधात नवनवीन खुलासे केले जात आहेत. मॉडेल पूनम पांडे, अभिनेत्री शर्लिन चोप्रा यांनी सोशल मीडियावर राज कुंद्रावर केलेल्या आरोपानंतर गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलने शर्लिन चोप्राला चौकशीसाठी समन्स बजावले होते. आपल्यावर कारवाई होईल या भीतीने या दोघींनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने २० सप्टेंबरपर्यंत दोघींना दिलासा देत कठोर कारवाई न करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले आहे.

कुंद्राच्या सांगण्यावरून शर्लिनने बनवला अ‍ॅप!

दरम्यान मंगळवारी राज कुंद्रा याची पोलिस कोठडी समाप्त झाल्यानंतर त्याला किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने राज कुंद्रा याची १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिने सोशल मीडियावर स्वत:चा एक व्हिडिओ व्हायरल केला होता, त्यात तिने राज कुंद्रा याची एक कंपनी मॉडेल्ससाठी अ‍ॅप तयार करते, कुंद्राने मला देखील अ‍ॅप बनवण्याची ऑफर केली होती, सर्व प्रकार समजून घेतल्यानंतर मी स्वत:चा अ‍ॅप तयार करण्यासाठी तयार झाले, असे तिने व्हिडिओमध्ये म्हटले होते, तसेच सर्वात अगोदर मी महाराष्ट्र सायबर सेलला याबाबत जबाब नोंदवला असल्याचे तिने म्हटले आहे. सायबर सेलने मला समन्स पाठवल्यानंतर मी कुठेही गायब झाले नाही अथवा पळून गेले नाही. मी सायबर सेलमध्ये जबाब नोंदवला असल्याचे तिने म्हटले होते.

पूनम पांडे म्हणाली, आपल्याला धमकावून करारावर स्वाक्षरी करून घेतली!

दरम्यान पूनम पांडे हिने देखील राज कुंद्रा प्रकरणात अनेक खुलासे केले आहेत. आपल्याला करारावर स्वाक्षरी करण्यास भाग पाडले गेले होते, असे तिने म्हटले होते. जेव्हा मी असे करण्यास नकार दिला असता मला माझ्या वैयक्तीक गोष्टी लिक करण्याची धमकी देण्यात आली होती, असे पांडे हिने म्हटले होते. राज कुंद्रा प्रकरणात नवे खुलासे होऊ लागल्यावर गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलने चौकशीसाठी शर्लिन चोप्राला समन्स बजावले होते, आपल्यावर कारवाई होईल यासाठी शर्लिन आणि पांडे या दोघी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी गेल्या होत्या. न्यायालयाने या दोघींना २० सप्टेंबरपर्यंत दिलासा दिला असून मुंबई पोलिसांनी तोपर्यंत या दोघींवर कठोर कारवाई करू नये, असा आदेश दिला आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजता शर्लिनला प्रॉपर्टी सेलमध्ये चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. पोर्नोग्राफी प्रकरणी अटक करण्यात आलेला राज कुंद्रा याचा मंगळवारी तिसरा रिमांड होता. मंगळवारी त्याला प्रॉपर्टी सेलने किल्ला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने राज कुंद्रा आणि त्याच्या कंपनीचा आयटी सेलचा प्रमुख रॉयन थोर्प या दोघांना १४ दिवसांची  न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. राज कुंद्रा याच्या वकिलांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला असून त्याच्यावर उद्या (बुधवारी) सुनावणी होणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.