मुंबई विमानतळाच्या हाय फ्रिक्वेन्सी रिसीविंग स्टेशनमुळे परिसराताल इमारतींचा पुनर्विकास रखडला असून सदर स्टेशन गोराई येथे स्थलांतरित करण्यात यावे अशी मागणी करीत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार बुधवारी यांनी केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांची भेट घेतली. (Ashish Shelar)
मुंबईतील अंधेरी पश्चिम, वर्सोवा, जूहु तसेच दहिसर या परिसरातील इमारतींचा पुनर्विकास रखडला असून मुंबई विमानतळाचे हाय फ्रिक्वेन्सी सेंटरच्या टाँवरमुळे या भागातील रहिवाशांना इमारतीच्या पुनर्विकासाला परवानगी मिळत नाही. हा प्रश्न भाजपा आमदार अमित साटम, आमदार मनिषा चौधरी गेली अनेक वर्षे सातत्याने मांडत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही याबाबतचे पत्र आणि सविस्तर अहवाल केंद्र सरकारला सादर केला आहे. (Ashish Shelar)
(हेही वाचा – Maharashtra Vidhan Parishad : २९ जुलैला राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार वितरण)
मुंबईतील सुमारे ५ लाख हून अधिक रहिवाशांची होणारी गैरसोय आणि त्यांच्या पुनर्विकासातील अडचणी पाहता हे स्टेशन गोराई येथे स्थलांतरित करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत असून आमदार अॅड. आशिष शेलार यांनी नव्या हवाई उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांची भेट घेऊन मुंबईकरांची ही मागणी निदर्शनास आणून दिली. याबाबत सकारात्मक चर्चा झाली असेही आमदार अॅड. आशिष शेलार यांनी सांगितले. (Ashish Shelar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community