२३ ऑगस्टला ‘शिखर सावरकर पुरस्कार’ सोहळा

187

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या आत्मार्पणाचे ५० वे स्मृतीवर्ष म्हणून २०१५ मध्ये विविध उपक्रम साकारले गेले. यामधील एक महत्त्वाचा उपक्रम होता तो हिमाचल प्रदेशात बातल नजीकच्या कर्चा नाला परिसरातील हिमशिखरावरील चढाईचा. यासाठी एक हिमालयीन मोहीम आयोजिली होती. त्यावेळी २३ ऑगस्टला हे शिखर मोठ्या हिकमतीने व धाडसाने सर केले व त्या शिखराचे नामकरण शिखर सावरकर असे केले गेले. या अविस्मरणीय दिवसाला पाच वर्षे पूर्ण होत असून, त्यानिमित्ताने या वर्षी २३ ऑगस्टपासून गिर्यारोहण व दुर्गसंवर्धनाच्या क्षेत्रात स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्यावतीने तीन मानाचे पुरस्कार देण्यात येत आहेत.

शिखर सावरकर पुरस्कार २३ अगस्त २०२०, सुबह ११ बजे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक के फेसबुक पेज और यूट्यूब चैनल पर

Posted by Swatantryaveer Savarkar Rashtriya Smarak on Friday, August 21, 2020

यामध्ये कर्नल प्रेमचंद यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. यात रोख रक्कम, सन्मानचिन्ह, मानपत्र याचा समावेश आहे. त्याचप्रमाणे लोणावळा येथील शिवदुर्ग मित्र या संघटनेला दुर्गसंवर्धन पुरस्कार देण्यात येणार आहे. यामध्येही रोख रक्कम, सन्मानचिन्ह, मानपत्र याचा समावेश आहे. तसेच सुरज मालुसरे यांना युवा साहस पुरस्कार देण्यात येणार आहे. यातही रोख रक्कम, सन्मानचिन्ह, मानपत्र याचा समावेश आहे.

या लिंकवर पाहा Live पुरस्कार सोहळा

सदर पुरस्कार वितरण समारंभाचे रविवारी २३ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी ११ वाजता फेसबुकवर व यूट्यूबवर लाईव्ह प्रसारण पाहाता येईल.

https://facebook.com/SavarkarSmarak

https://youtube.com/user/SavarkarSmarak

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.