पोलिसांसमोरच शिल्पा शेट्टी आणि राज कचाकचा भांडले!

एवढी सर्व लफडी केलीस, मला एका शब्दाने देखील सांगितले नाहीस, असे सांगत दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले.

राज कुंद्रा याच्या घर झडतीसाठी पोलिस त्याला जुहू येथील घरी घेऊन आले, त्यावेळी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्यात पोलिसांसमोरच कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर शिल्पाने रडत रडतच पोलिसांना जबाब दिला.
एवढी सर्व लफडी करून ठेवली, मला एक शब्दाने सांगितले नाही, यावरून दोघांमध्ये भांडण झाले असल्याचे सूत्रांनी दिलेल्या माहिती समजते.

एवढी लफडी केलीस मला सांगितलेही नाही!

शिल्पा कडाडली शुक्रवारी राज कुंद्रा याच्या पोलिस कोठडीत वाढ झाल्यानंतर प्रॉपर्टी सेलचे अधिकारी राज कुंद्राला घेऊन त्याच्या जुहू येथील बंगल्यावर घर झडती घेण्यासाठी आले होते. या दरम्यान शिल्पा शेट्टी बंगल्यावरच होती, राज कुंद्रा पोलिसांसोबत घरी आल्यानंतर, त्याला त्या अवस्थेत बघून शिल्पाला प्रथम रडू कोसळले. त्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक वाद होऊन शिल्पा त्याच्यावर भडकली आणि एवढी सर्व लफडी केलीस, मला एका शब्दाने देखील सांगितले नाहीस, यावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले.

(हेही वाचा : आपत्कालीन परिस्थितीत बचावकार्य करणारे एनडीआरएफ आहे तरी काय?)

मला वृत्तपत्रातून समजले!

पोलिसांनी मध्यस्थी करून दोघांची समजूत काढून शिल्पा शेट्टीचा जबाब नोंदवून घेतला. रडत रडतच तिने आपला जबाब पोलिसांना दिला. मला पॉर्न व्हिडिओबाबत काहीही कल्पना नव्हती, मी माझ्या कामात (शूटिंग) मध्ये व्यस्त होते, असे शिल्पाने आपल्या जबाबात म्हटले आहे. तसेच राजने मला याबाबत कधीही काही बोलला नाही. फेब्रुवारी महिन्यात पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर राज कुंद्रा याचे नाव देखील पॉर्न व्हिडिओमध्ये येत असल्याचे मला वृत्तपत्रातून कळले, असे शिल्पाने आपल्या जबाबात सांगितले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here